Ranveer Singh च्या फोटोशूटवर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या...

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी रणवीरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.
Swati Maliwal on Ranveer Singh Photoshoot
Swati Maliwal on Ranveer Singh PhotoshootDainik gomantak

Swati Maliwal on Ranveer Singh Photoshoot: व्हायरल न्युड फोटोशूटनंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग चर्चेत आहे. आता दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनीही या फोटोशूटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी गुरुवारी सांगितले की, महिलांचे असे फोटो शेअर करण्यास कुणाचा आक्षेप नाही परंतु अभिनेत्याच्या फोटोसाठी पोज देणे हा वृत्तवाहिन्यांवर चर्चेचा विषय बनला आहे.

स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून लिहिले, 'देशात खरा प्रश्न उरला नाही का? रणवीर सिंगचे व्हायरल झालेले फोटोशूट सध्या खूप चर्चेत आहे आणि मुंबईत त्याच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याने महिलांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांच्या फोटोंद्वारे त्यांची प्रतिष्ठा दुखावली आहे असा आरोप करण्यात आला आहे.'

Swati Maliwal on Ranveer Singh Photoshoot
Ranveer Singh: रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर विद्या बालनने केले मोठे विधान

दरम्यान,रणवीर सिंगच्या या फोटोशूटबद्दल अनेकांना राग आहे, तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या समर्थनात आहेत. द काश्मीर फाइल्सचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांना दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंगने या व्हायरल फोटोशूटबाबत एफआयआरबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी त्यावर आपले मत मांडले आहे. या प्रश्नावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा एक अत्यंत मूर्ख एफआयआर आहे, हा एक असा मुद्दा आहे ज्यावर विनाकारण एवढा गोंधळ सुरू आहे.

Swati Maliwal on Ranveer Singh Photoshoot
Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ ; 'न्यूड' फोटोशूट पडले महागात

याशिवाय, रणवीर सिंग याचं हे वादग्रस्त फोटोशूट आल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच इतरही अनेक लोकांनी यावर टीका केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com