तापसी पन्नू गोव्यात एन्जॉय करतेय शुटींगचे शेवटचे दिवस

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

अभिनेत्री तापसी पन्नूने गोव्यात निवांत वेळ घालवतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती अत्यंत निवांत आणि आनंदी दिसत आहे.

पणजी : अभिनेत्री तापसी पन्नूने गोव्यात निवांत वेळ घालवतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती अत्यंत निवांत आणि आनंदी दिसत आहे.सध्या तापसी गोव्यात तिच्या 'लूट लपेटा' या सिनेमाचं शूटींग करत आहे. शेअर केलेल्या फोटोत तापसी एका बीचवर मानमोहक सूर्यास्ताचा आनंद घेत आहे. तापसीने हा फोटो तिच्या इन्सटाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

कंगनाने ठोकला ट्विटरला रामराम QooApp वर करणार आता कावकाव

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसी पन्नूचा आगामी चित्रपट लूट लपेटाचं अखेरच्य़ा टप्प्याचं शूटींग सुरू झालं आहे. 'शुटींगच्या शेवटच्या सत्रातील शेवटाच्या दिवसाची शेवट यापेक्षा छान एसून शकत नाही' या आशयाचं कॅप्शन तापसीने या फओचोला दिलंय.'लूट लपेटा' हा चित्रपट 1998 च्या जर्मन चित्रपट 'रन लोला रन' चे हिंदी रूपांतर आहे, ज्यामध्ये फ्रँका पोटेंटे मुख्य भूमिकेत असून, टॉम टायकर यांने दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, तप्पसीने तिच्या पुढील 'शाब्बाश मिठू' चित्रपटासाठी प्रशिक्षणही सुरू केले आहे, ज्यात ती भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या