Tamannaah-Vijay : तमन्ना- विजयच्या नात्यावर युजर म्हणाला ही जोडी अजिबात...

साऊथचा ग्लॅमरस चेहरा तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या नात्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत.
Tamannah Bhatia
Tamannah BhatiaDainik Gomantak

Tamannaah-Vijay Affair: साऊथची अभिनेत्री तमन्ना भाटिया गेले काही दिवस अधुनमधुन चर्चेत असते. गेल्या काही दिवसांत तमन्ना आणि विजय वर्मा यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा सुरूय. सोशल मिडीयावर हे दोघे गेल्या काही दिवसांपासुन चांगलेच झळकत आहेत

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय एकत्र दिसत आहेत. हा व्हिडिओ नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटचा आहे,हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या डेटच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या.

मनोरंजनाच्या दुनियेतल कलाकारांच्या अफेअरच्या बातम्या काही नवीन नाहीत. सध्या अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेटिंगच्या बातम्यांना जोर आला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने दोघांचे एकत्र पार्टी करतानाचे फोटो समोर आले होते.

त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी आता तमन्ना आणि विजयचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्या सुरू झाल्या आहेत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तमन्ना भाटिया(Tamannah Bhatia) आणि विजय (Vijay Varma) एकत्र दिसत आहेत. हा व्हिडिओ नुकत्याच घडलेल्या एका कार्यक्रमाचा आहे. एले पुरस्कार सोहळ्यादरम्यान दोघांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

तमन्ना भाटिया मीडियासमोर पोज देत असताना विजय तिथून गेला आणि तिच्याशी बोलल्यानंतर तिला मिठी मारली. यानंतर दोघेही एकत्र बसलेले दिसले.

Tamannah Bhatia
Virat Kohli Instagram Posts Viral: किंग कोहलीने स्टोरीला शेअर केलेला 'हा' फोटो तुम्ही पाहिलात का?

तमन्ना आणि विजयचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. कुणी दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारत आहेत तर कुणाला दोघांची जोडी आवडलेली नाही नाही. चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना कमालच केली.

एक म्हणतो 'तम्मू चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहे', तर दुसऱ्याने 'जोडी चांगली नाही' असे लिहिले. तर, एकाने कमेंट केली, 'तो एक उत्तम अभिनेता आहे आणि ती एक सुंदर अभिनेत्री आहे, त्या दोघांना न्याय देणारे आपण कोण आहोत.'

चाहत्यांच्या प्रतिक्रिया काहीही असल्या तरी तमन्ना आणि विजय दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत हे मात्र नक्की. गोव्यात नवीन वर्ष साजरं करताना असो किंवा आता या कार्यक्रमात असो दोघे एकमेकांच्या सोबत राहण्याची एकही संधी सोडत नाहीत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com