Tamil Nadu Election 2021: मास्टर विजयच्या सायकलने केले ट्रॅफिक जॅम

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दक्षिण सुपरस्टार मास्टर अभिनेता विजय सायकलने मतदान केंद्रावर गेला. मतदान केंद्रावर जाण्यासाठी त्याने सायकल चालविल्यामुळे चेन्नई शहरात मोठा जमाव जमला आहे.

चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दक्षिण सुपरस्टार मास्टर अभिनेता विजय सायकलने मतदान केंद्रावर गेला. मतदान केंद्रावर जाण्यासाठी त्याने सायकल चालविल्यामुळे चेन्नई शहरात मोठा जमाव जमला आहे. काळ्या मास्कसह साधा हिरवा रंगाचा टी शर्ट परिधान करून मास्टर विजय मंगळवारी सकाळी लाल आणि काळ्या रंगाच्या सायकलवरून बूथकडे जातांना दिसला. चेन्नईच्या नीलांकरई येथे असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी तो गेला होता. 

आपल्या आवडत्या अभिनेत्याला मतदान केंद्राकडे जाताना पाहून लोकांनी गर्दी करण्यास सुरवात केली. अऊिनेता मास्टर विजयचे वय 46 वर्ष आहे. त्याच्या या सायकलींगचे व्हिज्युअल काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

BAFTA 2021: द व्हाइट टायगर साठी नॉमिनेशन झाल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला होता 

देशात वाढत्या इंधन दराचा निषेध करण्याचा हा त्याचा मार्ग होता. असे काही लोक म्हणत आहे. आज सकाळी 7 वाजता तामिळनाडूतील 88,000 हून अधिक बूथवर मतदान सुरू झाले. 16 व्या विधानसभेची निवडणूक लढत आहे. तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) मंगळवारी सायंकाळी  6 ते सायंकाळी 7 या वेळेत कोविड रूग्णांना मतदान करण्याची व्यवस्था केली आहे.

अमिषा पटेलचा ग्लॅमरस लूक; पाहा गोवा बीचवरचे फोटो 

अभिनेता विजय व्यतिरिक्त इतर अनेक नामांकित सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे अहवालानुसार अभिनेता अजित आणि त्यांची पत्नी शालिनी सकाळी 6.40 वाजता मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे होते. रजनीकांत, कमल हासन, सूर्या, कार्ती आणि विक्रम यांच्यासारख्या इतर सेलिब्रिटींनी सकाळी मतदान केल्याचे दिसले.

संबंधित बातम्या