तापसी-अनुरागने चित्रीकरणाला केली सुरुवात?

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

आयकर विभागाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी करचोरी केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचं सांगितले आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यासह त्यांच्याच संबंधितांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. मुंबई आणि पुण्य़ातील 30 ठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान अनुराग आणि तापसी यांची आयकर विभागाद्वारे चौकशी सुरु आहे. यातच अनुराग कश्यपद्वारा केलेल्या नव्या ट्विटची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आयकर विभागाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी करचोरी केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचं सांगितले आहे. अनुराग, तापसीच्या फॅंटम फिल्म हाऊसच्या संबंधित सर्वांना आयकर विभागाने ताब्यात घेतलं आहे. आणि त्यांची आयकर विभागाद्वारा कसून चौकशी करण्यात येत आहे. परंतु अनुराग कश्यपने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अनुराग आणि तापसी पन्नू दिसत आहे. तसंच त्याने या फोटोला ‘’And we restart our shoot # Do Baaraa असं कॅप्शन देण्यात आले आहे. आणि त्यांनी शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे.

तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; 5 कोटींच्या रोखीची पावती जप्त

मात्र या फोटोमागचं कारण अद्याप समोर आलेले नाही. कोणतं शूटिंग, कशाबद्दल ही पोस्ट करण्यात आली आहे. नुकतच अभिनेत्री तापसी पन्नूने या कारवाईसंदर्भात ''मी एवढी स्वस्त नाही'' असं ट्विट तिने केलं होतं. त्य़ावर अभिनेत्री कंगनाने ट्विट करत तापसी पन्नूला टोला लगावला. कंगना ट्विटमध्ये म्हणते की, ‘’तु नेहमीच स्वस्त राहशील’’   

 

संबंधित बातम्या