तापसी- अनुरागच्या घरातून कर चोरीचे मिळाले पुरावे- आयकर विभाग

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरातून 5 करोड कॅशमध्ये घेतल्याची पावतीही आयकर विभागाला मिळाली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नू आणि प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मिडियावरुन सातत्याने भूमिका मांडत असतात. मात्र तापसी आणि अनुराग यांच्या विरोधात आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाने अनुराग आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकत झाडाझडती सुरु केली. अनुराग आणि तापसी यांच्याबरोबरच विकास बहल आणि मधू मंटेना यांच्याही घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यांनी मोठ्याप्रमाणात कर चोरी केली असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले. एवढच नाही तर अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरातून 5 करोड कॅशमध्ये घेतल्याची पावतीही आयकर विभागाला मिळाली आहे. कराची चोरी करता येण्यासाठी एवढी मोठी रक्कम कॅशमध्ये घेतली असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

म्हणून शुटिंग सोडून निघून गेला आमिर खान

आयकर विभागाने मुंबईतील तब्बल 22 ठिकाणांवर छापेमारी केली. दरम्यान मोठ्याप्रमाणात कर चोरी केली असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. फॅंटम फिल्मच्या संबंधीत लोकांच्या घरांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तसेच मधु मंटेना यांच्य़ा क्वॉन कार्य़लयावरही छापे मारण्यात आले आहेत. फॅंटम फिल्मची हिस्सेदारी विकल्यानंतर त्याचे मूल्यांकन करण्यात आले होते. आयकर विभागाने 350 करोड रुपये कराची अनियमितता असल्याचे सांगितले आहे. 350 करोड रुपयापैकी 5 करोड रुपयाची पावती तापसी पन्नूच्या घरी भेटली आहे.

सीबीडीटीद्वारा सांगण्यात आले की, ''आयकर विभाग सर्च आणि सर्वे ऑपरेशन राबवत आहे. यामध्ये मुंबईतील दोन प्रमुख कंपन्या आहेत, एक अभिनेत्री, आणि दोन प्रतिभा प्रबंधन कंपन्या आहेत. मुंबई, पुणे, हैदराबाद या ठिकाणी आयकर विभागाद्वारे छापेमारी करण्यात येत आहे.'' अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळेच आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आसल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे.   

 

संबंधित बातम्या