आयकरच्या छाप्यानंतर तापसी पहिल्यांदाच बोलली...

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर अभिनेत्री तापसी पन्नूने पहिल्यांदाच ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नू आणि प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने 3 मार्च रोजी छापेमारी करण्यास सुरुवात केली. तापसी, अनुराग आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून फॅंटम फिल्म्सची सुरुवात केली होती. मात्र सध्या फॅंटम कंपनी बंद आहे. मुंबई आणि पुण्यातील 30 ठिकाणी आयकर विभागाद्वारे छापेमारी करण्यात आली.

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर अभिनेत्री तापसी पन्नूने पहिल्यांदाच ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''3 दिवसांच्य़ा आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या शोधात प्रामुख्याने 3 गोष्टींचा समावेश करण्य़ात येतो. 1 पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला बंगला कारण की, उन्हाळ्याच्या आत्ता सुट्ट्या सुरु होणार आहेत. 2 मी याआधीच नाकारलेल्या 5 कोटी रुपयाची कथित पावती. 3 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिलेल्या वृत्तानुसार 2013 मध्ये माझ्यावर टाकलेल्या आयकर विभागाच्या छाप्याची आठवण.''

तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; 5 कोटींच्या रोखीची पावती जप्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, आता आयकर विभागाने केलेली कारवाई यापूर्वी त्याच व्य़क्तींवर 2013 मध्ये छापे टाकण्यात आले होते. मात्र त्यावेळेस या गोष्टीची कोणत्याही प्रकारे चर्चा झाली नव्हती. सध्य़ाच्या परिस्थीमध्ये आयकर विभागाद्वारे केलेल्या कारवाईची चर्चा मोठा विषय़ बनली आहे. देशातील राजकीय नेत्यांनी, बॉलिवूड सेलेब्रिटींनी, राहुल गांधी आणि शिवसेनेने सुध्दा य़ा छाप्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. तसेच भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा प्रियकर मॅथियस बोई याने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजूजू यांना ट्विट केलं होतं. ''घरामध्ये तणाव निर्माण झाला आहे'' असं म्हटलं होतं. मात्र रिजूजू यांनी उत्तर देताना म्हटले की, ''कर्तव्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे.''    

 

संबंधित बातम्या