टार्झन स्टार जो लारा यांचा 58 व्या वर्षी विमान अपघातात मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

'टार्झन द एपिक अँडव्हेंचर्स' Tarzan The Epic Adventures या चित्रपटातील अभिनेता जो लारा Joe Lara यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

'टार्झन द एपिक अँडव्हेंचर्स' Tarzan The Epic Adventures या चित्रपटातील अभिनेता जो लारा Joe Lara यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या विमानात जो लारा यांच्यासोबत त्यांची पत्नीसुद्धा होती. अमेरिकेच्या नॅशविले शहराजवळील तलावामध्ये हे विमान कोसळलं आणि या भीषण अपघातात जो लारा यांचा मृत्यू झाला. शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता विमानाने फ्लॉरिडाच्या टेमिनी विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणाच्या काही मिनिटांनंतरच हा अपघात घडला. (Tarzan star Joe Lara dies in plane crash )

2018 मध्येच त्यांनी ग्वेन शॅम्बलिनशी लग्न केले होते. रदरफोर्ड काउंटीच्या अग्निसुरक्षा कॅप्टन जॉन इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, नॅशविलेजवळ पर्सी प्रिस्ट तलावात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. ब्रॅंडन हॅना, ग्वेन एस. लारा, विल्यम जे. लारा, डेव्हिड एल. मार्टिन, जेनिफर जे. मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स हे तिघेही ब्रॅन्टवुड, टेनेसी येथील रहिवासी आहेत. कुटुंबाशी संपर्क केल्यानंतर त्यांची नावे जाहीर केली आहेत. लारा अवघ्या 58 वर्षांचे होते. त्यांनी दोन लग्न केले होते.

ब्रिटनचे पंतप्रधान पुन्हा लग्नाच्या बेडीत; प्रियसीसोबत थाटला संसार 

फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी रात्री 11 वाजता फ्लॉरिडाच्या टेमिनी विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर 'सेस्ना सी 501' विमान नॅशविलेजवळ पर्सी प्रिस्ट तलावामध्ये कोसळले. हे विमान स्मर्ना रदरफोर्ड काउंटी विमानतळावरून पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ आणि एफएए दोन्ही पथक घटनास्थळी उपस्थित आहेत.

या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती
लारा ने 1988 मध्ये ‘टार्झन इन मॅनहॅटन’ या चित्रपटात टार्झन ची भूमिका साकारली होती. नंतर त्यांनी टीव्ही मालिका "टार्झन: द इपिक अॅडव्हेंचर" मध्ये देखील काम केले. ही मालिका 1996 पासून ते 1997 पर्यंत चालली. यामध्ये लाराच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली. 

जर मी मुख्यमंत्री झाली तर.. हुमा कुरेशीने केला खुलासा 

कारकीर्दीच्या शिखरावर
लाराने 2002 मध्ये वीस वर्षानंतर संगीतामध्ये करिअर करण्यासाठी अभिनय करणं सोडलं होतं. लारा त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असतानाचा हा काळ होता. आर्मस्ट्रॉंग आणि वॉरहेड या अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी आजही त्यांची आठवण येते. 

संबंधित बातम्या