सुंदरा मनामध्ये भरली मालिकेची टीम मुंबईत परतली 

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

महाराष्ट्र तसेच इतर राज्यांत लॉकडाऊनमुळे चित्रीकरण होऊ शकत नसल्याने अनेक टीव्ही मालिकांच्या कलाकारांनी गोव्याकडे धाव घेतली होती.

प्रसिद्ध मराठी मालिका सुंदर मनामध्ये भरली या मालिकेची टीम गोव्यात चित्रीकरण करत होती. मात्र गोव्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मालिकेतील कलाकारांना परत मुंबईत यावे लागले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण गोव्यात सुरु होते. (The team of Marathi TV series Sundara manamadhye natali returned to Mumbai)

महाराष्ट्र तसेच इतर राज्यांत लॉकडाऊनमुळे चित्रीकरण होऊ शकत नसल्याने अनेक टीव्ही मालिकांच्या कलाकारांनी गोव्याकडे धाव घेतली होती. मात्र आता गोव्यात सुद्धा कोरोना रुईग्णांची संख्या वाढू लागल्याने गोव्यातील विरोधीपक्ष तसेच स्थानिक नागरिकांकडून मालिकांच्या चित्रीकरणाला विरोध करण्यात येत होता. गोव्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गोवा मनोरंजन संस्थेने सर्व मालिकांच्या चित्रीकरणाचे परवाने रद्द केले. त्यामुळेच प्रसिद्ध मराठी मालिका सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची टीम पुन्हा मुंबईत परतली असल्याचे समजते आहे.  

COVID-19 Goa: ''कोरोना लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित चाचणी...

दरम्यान, मराठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या मालिकेत प्रकाश धोत्रे, अतिशा नाईक, अक्षया नाईक, समीर परांजपे, प्रमिती नरके,प्रणव प्रभाकर हे कलाकार मुख्य  भूमिकेत असून मनवा नाईकी या मालिकेच्या निर्मात्या आहेत. 

संबंधित बातम्या