Pippa Teaser Out: 1971च्या युद्धातील यंग लीडर बनून ईशान खट्टर करणार आर्मीचे नेतृत्व

बॉलिवूडचा युवा अभिनेता ईशान खट्टरचा आगामी चित्रपट पिप्पाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Pippa Teaser Out
Pippa Teaser OutDainik Gomantak

बॉलिवूडचा युवा अभिनेता इशान खट्टर (Ishaan Khatter) याचा आगामी चित्रपट पिप्पाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये इशान कॅप्टन बलराम सिंग मेहता यांच्या तरुणपणातील भुमिका साकारणार आहे. (The teaser of Ishaan Khatter upcoming film Pippa is out)

Pippa Teaser Out
Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याच्या मित्रांचा हात? मुसेवालाच्या वडीलांचा दावा

1971 मधील भारत-पाक युद्धावर आधारित, पिप्पा

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, निर्मात्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित पिप्पा (Mrunal Thakur) चित्रपटाचा पहिला टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. या चित्रपटात ईशान खट्टर मुख्य भूमिकेमध्ये असून त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरही महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित पिप्पामध्ये सोनी राजदान आणि प्रियांशू पैन्युली या अभिनेत्री देखील असणार आहेत. एक मिनिटाच्या टीझर व्हिडिओमध्ये ईशान कॅप्टन बलराम सिंग मेहता, 45 व्या कॅव्हलरी टँक स्क्वॉड्रनमधील तज्ञ म्हणून बांगलादेशविरुद्धच्या युद्धाचे नेतृत्व करताना दिसून येत आहे.

देशाला स्वतंत्र करण्याची तरुण नेत्याची तळमळ टीझरमध्ये दिसते

सुरुवात इंदिरा गांधींच्या पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा करण्यापासून होते आणि यानंतर भारतीय सैनिक स्वातंत्र्याच्या मिशनसाठी सज्ज होताना दाखवले आहेत. याशिवाय टीझरमध्ये इशान तरुण नेता म्हणून सैनिकांना शत्रूंचा पराभव करण्यासाठी प्रेरित करताना दिसून येत आहे. टीझरच्या काही सीन्समध्ये सोनी आणि मृणालची झलकही पाहायला मिळत आहे.

इंस्टाग्रामवर टीझर शेअर करताना ईशान खट्टरने लिहिले आहे की, 'पिप्पा 2 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी - एका चित्रपटाची झलक सादर करत आहोत ज्यामध्ये आपण आपले हृदय आणि आत्मा ठेवले आहे. आपली पृथ्वी, आपले लोक आणि आपली संस्कृती सदैव धन्य होवो तसेच आपल्या संरक्षण दलांचे शौर्य दाखविण्याची संधी मिळणे ही आपच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

Pippa Teaser Out
Independence Day: शाहरुख-सलमानसह या स्टार्सनी दिल्या स्वातंत्र्य दिनाचा खास शुभेच्छा

अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले आहे तसेच मीरा राजपूत, अनिल कपूर, संजना संघी आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी टीझरसाठी अभिनंदनाचा वर्षाव देखील केला आहे. हा चित्रपट बनवण्याची घोषणा 2020 मध्ये करण्यात आली होती तसेच या चित्रपटाबद्दल बोलताना, दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मृणाल, प्रियांशू पैन्युली आणि ईशान हे आमच्याकडे असलेले तीन सर्वात रोमांचक तरुण कलाकार आहेत.

खरे तर, अशा अप्रतिम तरुण प्रतिभेसोबत काम करायला मी खूप उत्सुक आहे आणि या कलाकारांनी पिप्पामध्ये जी ऊर्जा ठेवली आहे ती प्रशंसनीय आहे. पिपा या वर्षी 2 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com