Samantha's Yashoda: सामंथा प्रभूच्या 'यशोदा'चा टीझर रिलीज, जाणून घ्या या चित्रपटाबद्दल

Samantha's Yashoda: सामंथा प्रभूच्या 'यशोदा'चा टीझर रिलीज, जाणून घ्या या चित्रपटाबद्दल

समंथा प्रभूची (Samantha Prabhu) जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, साऊथ सोबत आता हिंदीतील प्रेक्षकही तिला पसंत करू लागले आहेत. पुष्पामधील 'ऊ अंतवा' (Pushpa Film) या गाण्यामुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली तसेच, 'द फॅमिली मॅन' (The Family Man) या वेब सिरिजमध्ये देखील तिने उल्लेखनीय काम केले आहे. सौंदर्यानेच नव्हे तर दक्षिणेतून हिंदी इंडस्ट्रीतही अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री समंथा प्रभू, आता 'यशोदा' या हिंदी चित्रपटातून (Yashoda Film Teaser) पहिल्यांदाच झळकण्यासाठी सज्ज झाली असून 'यशोदा' या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे.

Samantha's Yashoda: सामंथा प्रभूच्या 'यशोदा'चा टीझर रिलीज, जाणून घ्या या चित्रपटाबद्दल
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींचा 150 दिवस कंटेनरमध्ये मुक्काम, पाहा फोटो

समांथाच्या 'यशोदा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शन थ्रिलर हा चित्रपट अनेक अडचणींशी झुंज देत असलेल्या गर्भवती महिलेच्या त्रासांवर प्रकाश टाकते. चित्रपट टीझर अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला आहे. टीझरमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात एक गर्भवती महिला आव्हानांना तोंड देत आहे. टीझरला सोशल मीडिया यूजर्सचा चांगला पाठिंबा मिळत आहे.

समांथा 'यशोदा' चित्रपटात अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. यशोदा अॅक्शन-पॅक्ड सनेमा असून, समांथा चित्रपटात खूप अॅक्शन करताना दिसत आहे. सर्वाधिक भाषेत प्रदर्शित होणारा यशोदा हा पहिला चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा एकूण 5 भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख निश्चित झालेली नाही.

Samantha's Yashoda: सामंथा प्रभूच्या 'यशोदा'चा टीझर रिलीज, जाणून घ्या या चित्रपटाबद्दल
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 20 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com