Teaser Video: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाच्या मंगल घटिकेचे क्षण कॅमेरात कैद

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

 मराठी चित्रपट सृष्टीतील  प्रसिद्ध कलाकार  सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाचा टिझर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मितालीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये  मिताली आणि सिद्धार्थच्या मेहंदी, संगीत, लग्न आणि रिसेप्शनचे खास क्षण या टिझर व्हिडीओमध्ये दाखवले आहेत.

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील  प्रसिद्ध कलाकार  सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा नुकताच लग्न समारंभ पार पडला. दोन वर्षांपूर्वी मिताली आणि सिद्धार्थने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्या दोघांनी साखरपूडा केला होता. त्यानंतर दोघांनी त्यांच्या कपल फोटोशूटचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले होते. गेले कित्येक दिवस या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. 24 जानेवारीला पुण्यातील प्रसिद्ध 'ढेपे वाडा' येथे मिताली आणि सिद्धार्थचा शाही सोहळा पार पडला.

या शाही लग्न सोहळ्याला अभिज्ञा भावे, इशा केसकर,उमेश कामत,पूजा सामंत, भूषण प्रधान या चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलाकारांनी हजेरी लावली.मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमांना नेटकाऱ्यांनी विशेष पसंती मिळाली.

या लग्नाचा टिझर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मितालीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये  मिताली आणि सिद्धार्थच्या मेहंदी, संगीत, लग्न आणि रिसेप्शनचे खास क्षण या टिझर व्हिडीओमध्ये दाखवले आहेत. या व्हिडीओमध्ये मिताली आणि सिद्धार्थच्या मित्र मैत्रिणींनी केलेली मज्जा मस्ती दाखवली आहे. मिताली आणि सिद्धार्थचे कुटुंब खूप आनंदी दिसत आहेत. मितालीच्या आई-वडिलांचे इमोशन्स या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.  

त्यांच्या जिवनातला हा खास क्षणी त्यांनी कसा एन्जोय केला हे या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. या व्हिडीओला 'रंग माळीयेला' या मराठी गाण्याचे पार्श्वसंगीत संगीत दिले आहे. मिताली आणि सिद्धार्थची लग्नातील शाही एन्ट्री, संगित सोहळ्यातील दोघांचा डान्स,सप्तपदीचा विधी,मंगलाष्टका या सर्वांची झलक या टिझर व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओमुळे सिद्धार्थ आणि मितालीच्या फॅनला त्यांच्या लग्न सोहळ्याची विशेष क्षण पाहता आले.

संबंधित बातम्या