तेलंगणाच्या मनसा वाराणसीने पटकावला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा खिताब

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

तेलंगणामधील अभियंता मनसा वाराणसी हिने व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा खिताब पटकावला आहे. 

मुंबई : तेलंगणामधील अभियंता मनसा वाराणसी हिने व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा खिताब पटकावला आहे. माजी मिस इंडिया असलेली राजस्थानची सुमन रतन सिंग राव हिने तिला मिस इंडिया 2020 चा मुकुट चढवला. काल रात्री ही घोषणा करण्यात आली. हरियाणाच्या मानिका शियोकंद यांना व्हीएलसीसी फेमिना मिस ग्रँड इंडिया 2020, तर उत्तर प्रदेशच्या मन्या सिंगला व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 ची उपविजेती म्हणून घोषित करण्यात आलं. 

या सोहळ्याचं परिक्षण नेहा धुपिया, चित्रांगदा सिंग, पुलकित सम्राट आणि प्रसिद्ध डिझायनर जोडी फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी केलं.स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीचं नेतृत्व मिस वर्ल्ड एशिया सुमन राव हिने केलं. व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 चं आयोजन सेफोरा आणि रोपोसो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलं होतं. कलर्स टीव्ही चॅनेलवर 28 फेब्रुवारी रोजी या ग्रँड फिनालेचे प्रसारण होणार आहे.

संबंधित बातम्या