‘’लस कुठे उपलब्ध आहे ते मला एकदाचं सांगा?’’ 'या' सेलिब्रिटीने केला सवाल

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

लसीकरणासाठी लोकांना आवाहन करत असणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

देशात कोरोना रुग्ण वाढत असतानाही मोठ्याप्रमाणात लसीकरण देखील सुरु आहे. नुकतच केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मत्रांलयाने देशभरात एकूण 15 कोटी 21 लाख लोकांचे लसीकरण झाल्याचं जाहीर केलं आहे. अशातच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावरुन नागरिकांना लस घेण्याचं आवाहन करत आहेत. (Tell me once where the vaccine is available Asked the celebrity)

गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्राबाहेर लागलेल्या मोठ्या रांगाचं विदारक वास्तव पहायला मिळत आहे. सोशल मिडियावरही लसीकरण केंद्राबाहेरच्या मोठ्या रांगाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री निया शर्माने (Nia Sharma) कोरोना लसीकरणासाठी लोकांना आवाहन करत असणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

''अरे हाड! नागडा देश, नागडं सरकार''

अभिनेत्री निया शर्माने एक ट्विट करत लसीकरणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सेलिब्रिटींना काही प्रश्न विचारले आहेत. ती म्हणाली, ‘’या देशातील प्रत्येक जागृत सेलिब्रिटी लोकांना कोरोना लसीकरणासाठी आवाहन करत आहेत. कृपा करुन कोरोना लस उपलब्ध असलेल्या केंद्रांची नावे सांगा जेणेकरुन दिवसभर लसीकरण केंद्राबहेर उभे रहणारे हजारो लोक मूर्खासारखे तरी दिसणार नाहीत.’’

निया शर्माच्या सोशल मिडियावरील ट्विटनंतर तिच्या अनेक चाहत्यांनी या पोस्ट ला आपली सहमती दर्शवली आहे. तिच्या एका चाहतीने म्हटले की, ‘’अगदी बरोबर बोललीस निया लोक कोरोनाची लस घेण्यासाठी दिवसभर लसीकरणाबाहेर उभे राहत आहेत. सरकारला लोकांची काळजी असेल तर त्यांनी आधी कोरोना लसीच्या उपलब्धतेची खातरजमा करावी,’’ असं युजरने म्हटलं आहे.
 

संबंधित बातम्या