Thalaivi Trailer: कंगना देणार वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना खास गिफ्ट

Thalaivi Trailer: कंगना देणार वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना खास गिफ्ट
Thalaivi Trailer The trailer of Thalaivi will be launched on March 23 Kangana Ranauts birthday

Thalaivi Trailer: यावर्षी अभिनेत्री कंगना रणौतचा वाढदिवस खास असणार आहे, कारण 'थलाइवी' या चित्रपटाचा ट्रेलर  23 मार्चला लाँच होणार आहे. कंगना आणि थलाइवी चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला संस्मरणीय करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. प्रमोशनचा प्रत्येक अंदाज वेगळा आणि खास शैलीत असणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरवात बॉलिवूड क्वीन कंगना रणौतच्या वाढदिवसाच्या दिवसापासून सुरू होणार आहे.

दिग्दर्शक विजयच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आणि 'थलाइवी' चित्रपटाशी संबंधित प्रत्येक स्टार्ससाठी हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या मेहनतीचा ठरणार आहे. आपल्या औदार्य आणि प्रेमाने तामिळनाडूच्या राजकारणाला नवा आयाम देणारी एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत नेता जयललिता यांच्या महान जीवनातील विलक्षण बाबींची झलक कंगनाच्या वाढदिवसाला बघायला मिळणार आहे.  ही कंगनाच्या चाहत्यांसाठी आणि राडनैतिक लिडर जयललिता याच्या समर्थकांसाठी  ही सर्वात मोठी भेट असणार आहे.

भरतनाट्यमच्या युक्त्या शिकण्यापासून ते तामिळ भाषा आणि जयललिता, त्यांचे हातवारे, हावभाव या सगळ्यांचे तंतोतंत अनूकरण करण्यासाठी कंगणाने कठोर परिश्रम घेतले आहे. कंगना राणौतने एका प्रभावी व्यक्तीची जीवन कथा जगण्यासाठी पडद्यावर मांडण्यासाठी प्रत्येक कठीण प्रसंगाला तोंड दिले आहे.

यासह कंगना रनौत आणि अरविंद स्वामी यांची केमिस्ट्रीदेखील देखिल या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.  जयललिता आणि यम. जी रामचंद्रन यांच्याबरोबरच्या अनोख्या क्षणांना पुनरुज्जीवित करणारा हा चित्रपट असणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचा पहिला लूक पाहून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि या दोन मोठ्या पात्रांना पडद्यावर बघण्यासाठी प्रेक्षकवर्ग प्रतीक्षा करत आहे.

अलिकडे, दिवंगत नेता जयललिता यांच्या जयंतीनिमित्त निर्मात्यांनी 23 एप्रिल 2021 रोजी 'थलाइवी' पॅन इंडियाची घोषणा देखील केली. या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह यांनी केली आहे. याची निर्मिती हितेश ठक्कर आणि तिरुमल रेड्डी यांनी प्रोड्युस केली आहे. 23 एप्रिल 2021 रोजी हा चित्रपट झी स्टुडिओतर्फे तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित केला जणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com