The Kapil Sharma Showमध्ये येणार नवा कॉमेडियन; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी अनेक नवे चेहरे दिसणार आहेत, जे प्रेक्षकांना हसवतील.
Kapil Sharma Show
Kapil Sharma Show Dainik Gomantak

Kapil Sharma Show : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी अनेक नवे चेहरे दिसणार आहेत, जे प्रेक्षकांना हसवतील.

आता आणखी एक नवीन सदस्य या शोमध्ये सामील होणार आहे, ज्याने अनेक शोमध्ये आपल्या कॉमेडीने लोकांना हसवले आहे. आम्ही बोलत आहोत सिद्धार्थ सागरबद्दल, जो स्टँड अप कॉमेडियन आहे. अलीकडेच तो 'केस तो बनता है' या कॉमेडी शोमध्ये दिसला होता. लवकरच तो कपिलच्या शोमध्येही धमाल करणार आहे.

Kapil Sharma Show
Feng Shui Tips : करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी फेंगशुईच्या या 5 टिप्स वापरून पहा

अलीकडेच, सिद्धार्थ सागरने 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करण्याबद्दलचा उत्साह दाखवला आहे. तो म्हणाला, "मी 'केस तो बना है' या शोमध्ये काम करत होतो, ज्यामध्ये माझ्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. मला वाटते, त्यामुळेच मला 'द कपिल शर्मा शो'ची ऑफर देण्यात आली होती."

कपिलचे कौतुक करताना सिद्धार्थ म्हणाला, “कपिलसोबत काम करणे खूप रोमांचक आहे. त्याला विनोदाची खूप चांगली जाणीव आहे. आम्ही स्टेजवर परफॉर्म करतो तेव्हा मला खूप आनंद मिळतो."

पुढे त्याने सांगितले की, “यामध्ये दमदार परफॉर्मन्स, डान्स, कॉमेडी आणि मस्ती असेल, जे प्रेक्षक त्यांच्या कुटुंबियांसोबत पाहू शकतील. जेव्हा मी रंगमंचावर असतो तेव्हा मला कोणतेही दडपण जाणवत नाही. मी स्वतःला प्रभावित होऊ देत नाही, कारण जेव्हा कोणतेही दडपण नसते तेव्हाच प्रतिभा फुलते."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com