Oscars and 'The Kashmir Files' : थांबा थांबा...'द कश्मिर फाईल्स' ऑस्करसाठी शॉर्ट- लिस्टेड नाहीच...

'The Kashmir Files' हा चित्रपट ऑस्करसाठी सिलेक्ट नाही झाला. नेमका कुठं निवडला गेला?
Oscars Nominations
Oscars NominationsDainik Gomantak

The kashmir Files विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित 'द कश्मिर फाईल्स' ऑस्करसाठी निवडला गेला आहे असं चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी स्वत: सांगितले होते.

अलीकडेच विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर दावा केला होता की त्यांचा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. 'द काश्मीर फाइल्स' सोबत 5 भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये दाखल झाल्याचा दावाही त्यांनी केला. यानंतर 'द काश्मीर फाइल्स'ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू झाली. 

पण प्रत्यक्षात ही गोष्ट थोडी वेगळी आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या दाव्याने  'द काश्मीर फाइल्स'ची ऑस्कर २०२३ साठी निवड झाली आहे की चित्रपट पात्र झाला आहे हे कोणालाच समजले नाही.

चला तर मग नेमकं काय झालंय ते पाहुया. द काश्मीर फाइल्सची ऑस्करसाठी अद्याप निवड झालेली नाही, परंतु तो चित्रपट फक्त रिमाइंडर लिस्टमध्ये ठेवण्यात आला आहे. म्हणजेच शॉर्टलिस्ट श्रेणीत अजुनही चित्रपटाचा समावेश झाला नाही.

त्यामुळे हे नेमकं काय आहे ते जाणुन घेऊया. ऑस्कर रिमाइंडर यादी म्हणजे काय? हे समजुन घेऊया. ऑस्करसाठी चित्रपटाची निवड करण्यासाठी कोणते निकष लावले जातात? ऑस्करसाठी निवडल्या जाणार्‍या चित्रपटासाठी किती श्रेणी आहेत? चला पाहुया

रिमाइंडर यादीमध्ये ऑस्करच्या विविध श्रेणींमध्ये स्पर्धा करण्यास पात्र असलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या रिमाईंडर लिस्ट मध्ये असला म्हणजे त्याला ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे किंवा तो शॉर्टलिस्ट झाला आहे असे नाही.

Oscars Nominations
Kartik Aaryan's Upcoming Movie: कार्तिकचा अ‍ॅक्शन अवतार असलेल्या 'शहजादा'चा फर्स्ट लूक आला...

सध्या, 'गंगुबाई काठियावाडी', 'द काश्मीर फाइल्स' आणि 'कंतारा' यासह इतर भारतीय चित्रपट फक्त रिमाईंडर लिस्ट यादीत समाविष्ट आहेत. हे चित्रपट शॉर्टलिस्ट होतील की नाही किंवा कोणते होतील? हे 24 जानेवारीला कळेल.

कॅटेगरीत नामांकन मिळालेल्या सर्व चित्रपटांची घोषणा जानेवारी 2023 मध्ये केली जाणार आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सेसचे सदस्य या श्रेणीसाठी नामांकनांवर मत देतात. 

मतदानानंतर, मतांची मोजणी केली जाते आणि त्यानंतर जे चित्रपट निवडले जातात ते सर्वोत्कृष्ट चित्रपट ऑस्करसाठी स्पर्धा करतात. नामांकन 12 जानेवारीपासून सुरू होणार असून 17 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

 24 जानेवारीला अंतिम नामांकन जाहीर केले जाणार आहेत.त्यामुळे तुर्तास तरी द काश्मीर फाइल्स ऑस्करसाठी गेला असं म्हणता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com