IFFI 2021: द पॉवर ऑफ द डॉग

इफ्फीचा मिड-फेस्ट चित्रपट
IFFI 2021: द पॉवर ऑफ द डॉग
IFFI 2021: द पॉवर ऑफ द डॉगDainik Gomantak

लेखक, दिग्दर्शिका जॅन कॅम्पिओन यांनी दिग्दर्शित केलेला ‘द पॉवर ऑफ द डॉग’ (The Power Of The Dog) हा 52व्या इफ्फी चा (IFFI52) मिड-फेस्ट चित्रपट असेल. थॉमस सॅवेज यांनी 1967 साली याच नावावर लिहिलेल्या एका कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे.

‘द पॉवर ऑफ द डॉग’ या सिनेमाचा जागतिक प्रिमीयर 78 व्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 1 सप्टेंबर2021 रोजी झाला होता. या चित्रपटाने कॅम्पिओनला उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी सिल्वर लायनचा पुरस्कार मिळवून दिला होता. ऑस्ट्रोलिया, न्यूझिलंड आणि अमिरिकेत या चित्रपटाचे मर्यादित प्रदर्शन थिएटरमधून झाले आहे. डिसेंबर महिन्यात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

रॉटन टॉमेटो या संकेतस्थळावर या चित्रपटाला 91 टक्के अनुकूल अभिप्राय लाभले आहेत. त्यातल्या अभिप्रायानुसार दिग्दर्शिका जॅन कॅम्पिओन ला ‘द पॉवर ऑफ द डॉग’ मुळे तिच्या पिढीतील सर्वोत्तम दिग्दर्शिका म्हणून पुष्टी मिळाली आहे. इफ्फीतल्या रेट्रॉस्पेक्शन विभागात या वर्षी प्रख्यात हंगेरीयन दिग्दर्शक बेला तार आणि रशियन नाट्य-चित्रपट दिग्दर्शक आंद्रेई कोंचालवोस्की यांचे चित्रपट दाखविण्यात येतील.

IFFI 2021: द पॉवर ऑफ द डॉग
हेमा मालिनी यांना इफ्फीमध्ये 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने गौरविण्यात येणार

यंदाची इफ्फी श्रेष्ठ भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांचेही काही चित्रपट महोत्सवात दाखविणार आहेत. आणि अर्थात उद्या दिनांक 20 रोजी इफ्फीच्या शुभारंभी दाखविण्यात येणाऱ्या कार्लोस साऊरा यांच्या ‘द किंग ऑफ दी वर्ड’ या सांगितीक चित्रपटाची प्रतीक्षा साऱ्यानांच आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com