RRR चे प्रदर्शन आले पुढे ढकलण्यात, कोरोनामुळे प्रेक्षकांना करावी लागणार प्रतिक्षा !

जर्सीचे रिलीज पुढे ढकलण्यात आले. यातच आता पॅन इंडिया चित्रपट आरआरआरचे (RRR) प्रदर्शनही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
RRR चे प्रदर्शन आले पुढे ढकलण्यात, कोरोनामुळे प्रेक्षकांना करावी लागणार प्रतिक्षा !

RRR

Dainik Gomantak 

देशात कोरोना विषाणूचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील चित्रपटगृहेही बंद होत आहेत. हे पाहता अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे. जर्सीचे रिलीज पुढे ढकलण्यात आले. यातच आता पॅन इंडिया चित्रपट आरआरआरचे प्रदर्शनही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आरआरआरच्या (RRR) अधिकृत अकांऊटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. SS ते RRR राजामौली (SS rajamouli) यांनी दिग्दर्शन केले असून या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण (Ajay Devgan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

<div class="paragraphs"><p>RRR</p></div>
नेहा कक्करला गोव्यात केलेला कॉन्सर्ट पडला महागात

दरम्यान, RRR च्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे की, 'कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आमच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलत आहोत. सर्व प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, 'आपण सर्व प्रयत्न करुनही काही परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसतात. अनेक राज्ये पुन्हा एकदा कोरोना निर्बंध लावत असल्याने सिनेमागृहेही बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, फक्त तुम्ही तुमचा उत्साह काही काळ रोखून ठेवा. आम्ही योग्य वेळी भारतीय चित्रपटसृष्टीचे वैभव परत आणण्याचे वचन देतो. यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. RRR 7 जानेवारीला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com