Priyanka Chopra: ‘मॅट्रिक्स 4’ चा ट्रेलर होणार या दिवशी प्रदर्शित

‘आता लाल किंवा निळी (Red or blue)गोळी तुम्हाला निवडायचे आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन प्रियांकाने दिले
Priyanka Chopra: ‘मॅट्रिक्स 4’ चा ट्रेलर होणार या दिवशी प्रदर्शित
Priyanka ChopraDainik Gomantak

बॉलिवूडची (Bollywood)देशी गर्ल प्रियांकाने (Priyanka Chopra)सोशल मीडियावर पोस्ट करत मॅट्रिक्स 4 च्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तिच्या चाहत्यांसाठी तारीख जाहिर केली आहे.

प्रियांका चोप्राने बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये तिने स्वत: ची एक वेगळीच जागा बनवली आहे. त्यातच प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे ही दिसते. नेहमी सोशल मीडियावर नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका लवकरच ‘मॅट्रिक्स 4’ या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची प्रतिक्षा तिचे चाहते बऱ्याच दिवसापासून करत आहेत. प्रियांकाने तिच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिर केली आहे.

Priyanka Chopra
बॉलिवूडची बदनामी थांबवा; चित्रपट निर्मात्यांनी दाखल केली याचिका

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram)अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. ट्रेलर प्रदर्शनाची तारीख शेअर केली आहे. तिने चाहत्यांना लाल किंवा निळी यापैकी कोणतीही एक गोळी निवडायला सांगितली आहे. चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी सकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार असल्याचेही तिने आपल्या पोस्ट मध्ये शेयर केले. ‘आता लाल किंवा निळी गोळी तुम्हाला निवडायचे आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन प्रियांकाने दिले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com