VIDEO VIRAL: 'पुष्पा' चा खुमार कायम, गोरिल्लाने केली 'श्रीवल्ली' वर हुकस्टेप

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोरिल्ला श्रीवल्ली गाण्यावर (Srivalli Songs) हुकस्टेप करताना दिसत आहे.
VIDEO VIRAL: 'पुष्पा' चा खुमार कायम, गोरिल्लाने केली 'श्रीवल्ली' वर हुकस्टेप
Gorilla Dainik Gomantak

अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राइज या चित्रपटाची क्रेझ संपण्याचं नाव घेत नाही आहे. 'पुष्पा' चित्रपटातील गाण्याची हुक स्टेप सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. याआगोदर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर सेलिब्रिटींनी पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर हुक स्टेप केली आहे. आता 'पुष्पा'चा खुमार प्राण्यांवरही चढू लागला आहे. सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता की, पुष्पाची जादू प्राण्यांवर झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोरिल्ला श्रीवल्ली गाण्यावर हुकस्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही एका मिनिटासाठी थक्क व्हाल. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून युजर्सनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. (The video of the gorilla dancing to the song Srivalli is going viral on social media)

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या गाण्यांवर आणि डॉयलॉगवर लोक रील बनवत आहेत. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटानं वेडं लावलं आहे. आता या यादीत प्राण्यांचाही समावेश झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे तुम्ही देखील साक्षीदार व्हा, जो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक गोरिल्ला सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर हुकस्टेप करताना दिसत आहे. सोशल मिडियावर प्रत्येकजण हा व्हिडिओ लाइक आणि शेअर करत आहे.

Gorilla
'पुष्पा 2' मधून समांथा आऊट; सलमान खानची 'ही' नायिका करणार 'आयटम साँग'

तसेच, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना पाहून एक गोरिल्ला त्याच्या एन्क्लोजरमध्ये फिरत असताना पुढे येतो. कठड्यावर येताच गोरिल्लाने शिडीवर उभं राहून तिरप्या बाजूने चालायला सुरुवात केली. गोरिलाची हीच हालचाल तिथे उपस्थित लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यातील काही क्रिएटिव्ह कंटेंट क्रिएटरने हा व्हिडिओ संपादित केला. यादरम्यान सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com