'वाकिल साब' ला झालेल्या गर्दीमुळे थेटरला ठोकले टाळे

'वाकिल साब' ला झालेल्या गर्दीमुळे थेटरला ठोकले टाळे
Theater was sealed as crowds gathered in the hall to watch Pawan Kalyan movie Vakeel Saab In Odisha

Vakil Saab: काल ओडिसामध्ये पावन स्टार अभिनीत तेलुगू चित्रपट 'वाकिल साब' पाहण्यासाठी हॉलमध्ये मोठी गर्दी जमली होती. या लोकांनी कोविड -19 च्या नियमांचे उल्लंघन केले. त्यानंतर ओडिशाच्या गजपती जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन न केल्याने परळखेमंडी येथील दोन सिनेमा हॉलवर सील केले. 9 एप्रिलला 'वाकिल साब'  चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

त्याचबरोबर ओडिशामधील कोरोना प्रकरणात वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने छत्तीसगडच्या सीमासुद्धा बंद केल्या आहे. शेजारच्या राज्यातून ओडिशामध्ये येणार्‍या लोकांना प्रवेशासाठी कोविड नकारात्मक अहवाल देखील द्यावा लागणार आहे. यासह राज्यात मास्क न घातल्यास दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. या आधीसुद्दा वकील साब चा टिझर रिलीज झाला असता चाहत्यांनी तोड फोड कोली होती. 

पवन कल्याणच्या ‘वाकील साब’ या चित्रपटाचा ट्रेलर होळीच्या दिवशी प्रदर्शित झाला होता आणि शहरातील निवडक चित्रपटगृहात सोमवारी सायंकाळी 4 वाजता तो प्रदर्शित झाला होता. ही माहिती मिळताच संगम थिएटरला दुपारपासूनच पवन कल्याणचे चाहते एकत्र होऊ लागले आणि ट्रेलरच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहू लागले. यानंतर वाकिल साबचा ट्रेलर लाँच होताच तेथे चेंगराचेंगरीसारखे वातावरण निर्माण झाले. प्रत्येकजण आपल्या आवडत्या अभिनेत्याची पडद्यावरीची झलक पाहण्यासाठी हताश दिसत होता.

दरम्यान चाहत्यांनीच थिएटरमध्ये मारा-मारी करायला सुरवात केली. अगदी प्रेक्षकांनी थिएटरमधील काचा फोडल्या आणि आत जाण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला होता ज्यात सिनेमागृहात गर्दी दिसत होती. दरम्यान, काही लोक जमिनीवरही पडले होते तर काही लोकांना थेटरच्या काचा फोडल्या होत्या.

पवन कल्याण सुमारे दोन वर्षानंतर  चित्रपट जगात पुनरागमन करीत आहे. या कारणामुळे फॅन्सचा उत्साहसुद्धा अधिक होता. पवनचा ‘वाकील साब’ हा चित्रपट पिंक या बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये अबिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसले होते. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com