पदार्पणातच दिग्दर्शकांची झेप!

पदार्पणातच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) सहभागी होण्याचे भाग्य चित्रपट दिग्दर्शकांच्या वाट्याला येण्याचे प्रमाण यावर्षी वाढलेले आहे हे भारतीय चित्रपटांच्या दृष्टीने एक सुचिन्ह आहे.
पदार्पणातच दिग्दर्शकांची झेप!
International Film Festival of IndiaDainik Gomantak

पदार्पणातच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival of India) सहभागी होण्याचे भाग्य चित्रपट (films) दिग्दर्शकांच्या वाट्याला येण्याचे प्रमाण यावर्षी वाढलेले आहे हे भारतीय चित्रपटांच्या दृष्टीने एक सुचिन्ह आहे. यावर्षीच्या इफ्फीच्या ‘इंडियन पॅनोरमा विभागा’त असलेल्या 24 भारतीय चित्रपटांपैकी 12 चित्रपट, त्या दिग्दर्शकांचे पहिले चित्रपट आहेत. त्या 12 चित्रपटांपैकी 4 चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. तीन भारतीय चित्रपट मयूर पुरस्कार, विशेष ज्युरी पुरस्कार, विशेष उल्लेख आदी पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. तीन भारतीय चित्रपट युनेस्को/आयसीएफटी पुरस्कारांच्या स्पर्धेत आहेत तर दोन भारतीय चित्रपट उत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणासाठीच्या पुरस्कारासाठी उत्सुक आहेत.

‘इंडियन पॅनोरामा’ विभागाच्या उद्‌घाटनाचा चित्रपट ‘सेमखोर’ हा दिमसा भाषेतला चित्रपट, भारतातर्फे या वर्षी ऑस्करसाठी निवडण्यात आलेल्या ‘कोझंगल’ या तामिळ चित्रपटाबरोबरच इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इतर देशातल्या चित्रपटांबरोबर स्पर्धा करेल. या दोन्ही चित्रपटांद्वारे, त्या चित्रपटांचे दिग्दर्शक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपले पदार्पण करत आहेत. याचाच अर्थ असा की आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणातच दखल घेण्याइतकी पात्रता आजच्या तरुण भारतीय चित्रपट दिग्दर्शकांची आहे.

International Film Festival of India
‘इफ्फी’ची तयारी सजावट आणि रंगरंगोटी, मात्र पावसाने फेरले पाणी

कोझंगल

हा चित्रपट दारुड्या व्यक्ती(गणपती)ची गोष्ट सांगतो. त्याच्या बायकोने घर सोडले आहे. गणपती आपल्या मुलाला घेऊन बायकोला परत आणण्यासाठी निघतो. त्याच्या त्या प्रवासातून आपल्याला मदुराईच्या आसपास असलेल्या गावातले दुष्काळाचे बधिर करणारे दर्शन घडते.

फ्युनरल

हिरा एक निम्न मध्यमवर्गीय माणूस आहे. त्याचा एक प्रश्न आहे, एक माणूस जेव्हा मरतो तेव्हा तो स्तब्ध असतो पण त्याच्या भोवतालचे सारे रडत असतात. का? त्यानंतर तो मृतांच्या विधीसंबंधीच्या सोपस्करांची एक रचना बनवतो. या रचनेत मृतांचे नातेवाईक मृताला साऱ्यांच्या कायम लक्षात राहील अशा पद्धतीने निरोप देऊ शकतील.

डोल्लु

हा चित्रपट कर्नाटकातून अस्तंगत होणाऱ्या ‘डोल्लु कुलिथा’ या लोकनृत्याच्या पार्श्वभूमीवर कथा मांडतो. स्थलांतरामुळे माणसे आपली मुळे विसरत जातात. वेगात वाढत असलेल्या शहरीकरणामुळे लोककला आणि ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. या साऱ्या बाबी डोल्लू या चित्रपटातून मांडल्या गेल्या आहेत.

International Film Festival of India
52व्या इफ्फीमधल्या स्पर्धा विभागाचे ज्युरी मंडळ

सेमखोर

सेमखोर समाजात जेव्हा एखादी स्त्री बाळंतपणात वारते तेव्हा तिने जन्म दिलेल्या नवजात शिशुलादेखील तिच्याबरोबर जिवंतपणीच पुरले जाते. स्त्रीला या समाजात कुठलाच आवाज नाही. मात्र मातृत्व हरवलेल्या आपल्या नातीच्या आयुष्यात या समाजातली एक स्त्री प्रकाश घेऊन येते. ती ‘सेमखोर’साठी एक नवी पहाट असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com