Jawaharlal Nehru Death Anniversary: बॉलिवूडच्या या प्रमुख कलाकारांनी साकारली चाचा नेहरूंची भूमिका

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 मे 2021

बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये बर्‍याच स्टार्सनी जवाहरलाल नेहरूंची भूमिका साकारली आहे. चला जाणून घेऊया ते फेमस अभिनेते आहेत आणि त्यांनी कोणत्या चित्रपटात जवाहरलाल नेहरूची भूमिका केली होती.

पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आज त्यांची पुण्यतिथी देशभर साजरी केली जात आहे. महात्मा गांधी सोबत मिळून देशाला स्वातंत्र्य देण्यात  जवाहरलाल नेहरू यांचेही योगदान आहे. स्वातंत्र्यलढ्यात पंडित नेहरूंनी 3359 दिवस तुरुंगात घालवले. त्यांना 9 वेळा तुरुंगात पाठविण्यात आले. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता. जवाहरलाल नेहरू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 27 मे 1964 रोजी दिल्लीत निधन झाले. मृत्यूच्या वेळी ते 74 वर्षांचे होते. अशा परिस्थितीत बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये बर्‍याच स्टार्सनी जवाहरलाल नेहरूंची भूमिका साकारली आहे. चला जाणून घेऊया ते फेमस अभिनेते आहेत आणि त्यांनी कोणत्या चित्रपटात जवाहरलाल नेहरूची भूमिका केली होती.(These leading actors of Bollywood have played the role of Jawaharlal Nehru in films)

अभिनेत्याचे नाव - रोशन सेठ
चित्रपट - गांधी (1982)
जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारणारे पहिले नाव रोशन सेठ आहे. त्यांनी गांधी  चित्रपटात जवाहरलाल नेहरूची भूमिका साकारली होती हा चित्रपट 1982साली प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटाला BAFTA पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. रोशन सेठ यांना या भूमिकेसाठी बाफ्टा पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी  नामांकन देण्यात आले होते. जवाहरलाल नेहरूची भूमिका आजपर्यंत ज्या सर्व लोकांनी निभावली होती त्यांच्यापैकी रोशन सेठ यांटा दिसण्याचा अंदाज नेहरूजींसारखाच होता. रोशन सेठ हे एक ब्रिटिश अभिनेत्याचे, लेखक आणि स्टेज दिग्दर्शक आहे.

बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स

अभिनेत्याचे नाव - प्रताप शर्मा
चित्रपट - नेहरू ( 1990 )
जवाहरलाल नेहरूंची व्यक्तिरेखा प्रताप शर्मा यांनी 'नेहरू' चित्रपटात साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन किरण कुमार यांनी केले होते. त्यावेळी हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. मात्र प्रसिद्ध अभिनेते प्रताप शर्मा यांचे 2011 मध्ये निधन झाले.

अभिनेत्याचे नाव - बेंजामिन गिलानी
चित्रपट - 'सरदार' (1993)
1993 साली सरदार या चित्रपटात बेंजामिन गिलानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूची भूमिका केली होती. या चित्रपटाद्वारे त्यांना खूप प्रेम मिळालं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहता यांनी केले होते.

अभिनेत्याचे नाव - सौरभ दुबे
चित्रपट - लीजेंड ऑफ भगतसिंग (2002) 
अजय देवगणच्या 'लीजेंड ऑफ भगतसिंग' या सुपरहिट चित्रपटात सौरभ दुबे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूं यांची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंत केले होते. त्याचबरोबर हा चित्रपट बर्‍याचदा टीव्हीवरही दाखविला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी २००२ मध्ये केले होते.

कलाकारांच्या फोटो पोस्टवरती अन्नू कपूर भडकले

अभिनेत्याचे नाव - डेन्झिल स्मिथ
चित्रपट - शोभायात्रा (2004) 
डेन्झिल स्मिथ यांनी शोभायात्रा चित्रपटात पंडित जवाहरलाल नेहरूची भूमिका केली होती. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. शोभायात्रा चित्रपटाचे दिग्दर्शन शाफत खान यांनी केले होते.

अभिनेत्याचे नाव - दलीप ताहिल
चित्रपट - भाग मिल्खा भाग (2013) 
दलीप ताहिलने प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंगच्या बायोपिकमध्ये जवाहरलाल नेहरूची भूमिका साकारली होती. फरहान अख्तरचा 'भाग मिलखा भाग' हा सिनेमा 2013 मध्ये आला होता. जो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले होते.
अभिनेत्याचे नाव - बेंजामिन गिलानी

 

संबंधित बातम्या