या दिवाळीला अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंह सांगणार बिटकॉइनचे फायदे

सोने नाही तर डिजीटल सोने खेरदी करण्यासाठी बॉलिवूडचे स्टार अभिनेते देणार जनतेला प्रोत्साहन
या दिवाळीला अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंह सांगणार बिटकॉइनचे फायदे
This Diwali Amitabh Bachchan and Ranveer Singh will explain benefits of BitcoinDainik Gomanatak

दिवाळीच्या (Diwali) शुभ मुहूर्तावर खरेदीला खूप महत्त्व आहे. दिवाळीपूर्वी पडणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी (Shopping) करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण या दिवाळीत भारतीयांमध्ये सोन्या ऐवजी डिजिटल सोन्याची म्हणजेच बिटकॉईनची (Bitcoin) चर्चा रंगत आहे. या दिवाळीत बॉलिवूडचे (Bollywood) दोन मोठे स्टार अभिनेते सोन्याऐवजी क्रिप्टोकरन्सी (cryptocurrencies) खरेदी करण्याचा सल्ला देतांना दिसत आहेत.

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीयांसाठी चांगली आणि सुलभ गुंतवणूक म्हणून सोन्यापेक्षा क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देताना दिसणार आहेत. यासाठी, त्यांनी क्रिप्टो एक्सचेंज CoinDCX सह करार केल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. बेंगळुरूस्थित CoinSwitch Kuber आणि CoinDCX सारख्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस सोन्याला पर्याय म्हणून बिटकॉइनचा वापर करत आहेत.

रणवीर सिंग CoinSwitchKuber मध्ये सामील झाला

याआधी अभिनेता रणवीर सिंगला भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज CoinSwitchKuber चा पहिला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते जेथे तो कंपनीच्या "कुछ तो बदलेगा" मोहिमेचा एक भाग बनला आहे. कंपनीच्या एका जाहिरातीत रणवीर सिंगने त्याच्या गल्लीबॉय स्टाइल चित्रपटातल्या सारखा एक हिंदी रॅप दिला आहे, ज्यामध्ये क्रिप्टो ट्रेडिंग किती सोपे आहे हे सांगितले आहे. रणवीर सिंगनेही आपल्या ट्विटर पेजवर हा रॅप शेअर केला आहे, ज्याला "क्रिप्टो बोले टू कॉइन्सविच! भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो अॅप वर लग जा ना, छोटे! कॉइन्सविच कुबेर डाउनलोड करा आणि आपला क्रिप्टो प्रवास 100 रुपयांपासून सुरू करा." असे कॅप्शन दिले आहे.

This Diwali Amitabh Bachchan and Ranveer Singh will explain benefits of Bitcoin
देशात लवकरच 6G येणार?

मात्र यातील मुख्य चिंतेची बाब म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 2020 चा निर्णय; कोर्टाने बंदी ज्यामध्ये उठवेपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगवर प्रभावीपणे बंदी घातली होती. परिणामी क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी असली तरी, मोठ्या संख्येने लोकं अजूनही गुंतवणूक करण्यास कचरत आहेत.

This Diwali Amitabh Bachchan and Ranveer Singh will explain benefits of Bitcoin
ऋषी कपूर आणि नीतू कपूर दोघेही त्यांच्या लग्नात झाले होते बेहोश

सेलिब्रिटींना सहभागी करण्यामगचा हेतू काय?

अशा परिस्थितीत, एखाद्या सेलिब्रिटीची जोड क्रिप्टोला मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करते आणि म्हणून प्रसिद्ध अभिनेते बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा सहभाग लोकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करेल. ोयाआधी, अमिताभ बच्चन ऑनलाइन आणि इतर बँकिंग फसवणुकीविरोधात आरबीआयच्या मोहिमेचा स्टार चेहरा राहिले आहेत. आभासी चलनासाठी भारताची योजना बाजूला ठेवून, रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीवर टीका केली आहे आणि त्यांच्यावर बंदीची मागणी केली आहे. ब्लूमबर्गच्या बातमीनुसार, अधिकाऱ्यांनी आठवड्याच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती.

Related Stories

No stories found.