सलीम खान यांच्या दुसऱ्या लग्नावर 'ही' होती सलमान खानची प्रतिक्रिया
This was first reaction of Salman Khan on Father Salim Khan's second marriageDainik Gomantak

सलीम खान यांच्या दुसऱ्या लग्नावर 'ही' होती सलमान खानची प्रतिक्रिया

बॉलीवूडमध्ये (Bollywood) असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चेत असतात.

बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चेत असतात. हेलन (Helen) यांनी 21 नोव्हेंबर रोजी त्यांचा 83 वा वाढदिवस साजरा केला. हेलन यांची गणना त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये केली जात असे. 1981 मध्ये अभिनेत्रीने सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांच्याशी लग्न केले. सलमान खाननेही (Salman Khan) एकदा एका मुलाखतीदरम्यान याबाबत चर्चा केली होती

This was first reaction of Salman Khan on Father Salim Khan's second marriage
Birthday Special: कार्तिक आर्यनने 10वीत असताना पहिल्यांदा केले होते डेट

सलमान खानला आला होता राग

1990 मध्ये एका मुलाखतीदरम्यान सलमान खान म्हणाला होता की, माझ्यासाठी माझी आईच सर्वस्व आहे आणि यामागे दुसरे कोणतेही कारण असावे असे मला वाटत नाही. मी आईचा मुलगा आहे म्हणून मी माझ्या आईशी खूप चांगले आहे. मी त्यांना कधीही दुःखी पाहू शकत नाही. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा आईला खूप दुःख झालं होतं. जेव्हा ती माझ्या वडिलांच्या घरी येण्याची वाट पाहत असे तेव्हा मला खूप राग यायचा.

सलमान दहा वर्षांचा होता...

याच मुलाखतीत सलमान खान पुढे म्हणाला होता की, आई हळूहळू हे सत्य स्वीकारू लागली. यासोबतच पप्पांनी आम्हाला समजावून सांगितले की, त्यांचे आईवर खूप प्रेम आहे आणि ते नेहमी आपल्या सर्वांसोबत असतील. त्यावेळी तो फक्त दहा वर्षांचा होता, त्यामुळे हेलन यांना मान्य करायला वेळ लागला, असं सलमान खान म्हणाला होता. पण आता ती त्याच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहे. सलमानच्या म्हणण्यानुसार, त्याचे कुटुंब बंद मुठीसारखे आहे, जेव्हा एकमेकांची गरज असते तेव्हा आम्ही सर्वजण उपस्थित असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.