लग्न न करता पालकांची जबाबदारी पार पाडणारे बॉलिवूडमधील 7 कलाकार

असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (celebrity) आहेत ज्यांनी लग्न न करताच पालक बनण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्न न करता पालकांची जबाबदारी पार पाडणारे बॉलिवूडमधील 7 कलाकार
Those 7 celebs who are fulfilling the responsibility of parents without getting married Dainik Gomantak

अनेक बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनी 'पालक होण्यासाठी लग्न (Marriage) करणे आवश्यक आहे' असे म्हणणे चुकीचे सिद्ध केले आहे. असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांनी लग्न न करताच पालक बनण्याचा निर्णय घेतला आहे. या कलाकारांनी समाजातील रूढीवादी कल्पनाच चुकीच्या असल्याचे सिद्ध केले नाही तर मुलांची जबाबदारीही ते उत्तम प्रकारे पार पाडत आहेत.

आज आम्‍ही तुम्‍हाला चित्रपट जगतातील अशा सेलिब्रिटींची ओळख करून देऊ, ज्यांनी लग्न न करता अनाथांचे जीवन सुधारण्‍याचा निर्णय घेतला.

Those 7 celebs who are fulfilling the responsibility of parents without getting married
गंगूबाई काठियावाडीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

1. नीना गुप्ता

नीना गुप्ता ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे आणि एक सशक्त महिला देखील आहे. नीना गुप्ता विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि अविवाहित आई बनली. नीना गुप्ताने एकटीने तीची मुलगी मसाबा गुप्ताची जबाबदारी उचलली आणि आज संपूर्ण जग या आई-मुलीची जोडी ओळखते.

2. सुष्मिता सेन

सुष्मिता सेन अवघ्या 25 वर्षांची होती जेव्हा तिने मुलगी दत्तक घेऊन आई होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने या गोंडस मुलीचे नाव रिनी ठेवले आहे. रिनीनंतर सुष्मिता सेनने 2010 मध्ये दुसरे मूल दत्तक घेतले. सुष्मिताच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. सिंगल मदर असूनही सुष्मिताने मुलींच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही.

3. प्रीती झिंटा

2009 मध्ये प्रिती झिंटाने ऋषिकेशमधील एका अनाथाश्रमातून 34 मुलींना दत्तक घेतले होते. आईप्रमाणे प्रीती झिंटा सर्व मुलींची काळजी घेत आहे. त्यानां भेटण्यासाठी ती वर्षातून दोनदा ऋषिकेशलाही जाते.

4. शोभना चंद्रकुमार पिल्लई

शोभना चंद्रकुमार ही एक दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जिने २०१० मध्ये मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. शोभनाच्या मुलीचे नाव अनंता, जिला ती खूप प्रेमाने ठेवते.

5. तुषार कपूर

तुषार कपूर देखील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांनी अद्याप लग्न केले नाही, परंतु एका मुलाचा वडील आहे. तुषार कपूरच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे.

6. एकता कपूर

टीव्ही सीरियल क्वीन एकता कपूरने 2019 मध्ये सरोगसीद्वारे मुलाची आई होण्याचा निर्णय घेतला. एकताच्या मुलाचे नाव रवी आहे.

7. करण जोहर

करण जोहरही जुळ्या मुलांचा सिंगल डॅड बनून आयुष्याचा आनंद घेत आहे. करणच्या मुलीचे नाव रुही आणि मुलाचे नाव यश आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com