दिशा पाटणीच्या 'किकला' टायगर श्रॉफची रिॲक्शन,Video Viral

अलीकडेच, दिशाने (Disha Patani) आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लोक टायगर श्रॉफला (Tiger Shroff) मिस करत आहेत.
दिशा पाटणीच्या 'किकला' टायगर श्रॉफची रिॲक्शन,Video Viral
Tiger Shroff reaction on Disha Patani's videoDainik Gomantak

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. बॉलिवूड अभिनेत्रींच्या त्या यादीत तिचा समावेश आहे जो फिटनेस फ्रिक आहेत. ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया (Social Media) पेजवर तिचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असते . अलीकडेच, दिशाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लोक टायगर श्रॉफला (Tiger Shroff) मिस करत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून चाहते टायगर श्रॉफचा दिशावर होणारा परिणाम देखील सांगत आहेत.(Tiger Shroff reaction on Disha Patani's video)

वास्तविक, दिशाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या वर्कआउट सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती एकामागोमाग एक लाथ मारताना दिसत आहे. ज्याप्रमाणे टायगर श्रॉफ हवेत उडताना आणि त्याच्या चित्रपटांमध्ये शत्रूंचा पराभव करताना दिसतो.तसाच दिशाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Tiger Shroff reaction on Disha Patani's video
Video: उर्मिला मातोंडकर आणि माधुरी दीक्षितच्या डान्सचा जलवा पाहिला का?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर टायगरने कमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टाळी, आग आणि प्रेम इमोजी बनवून दिशाचे कौतुक केले आहे.

दिशा पटानीने 'लोफर' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', राधे या चित्रपटात दिसली. लवकरच दिशा आता 'एक व्हिलन रिटर्न्स' मध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारियासोबत दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com