TikTok Star Megha Thakur Dies: 21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचा अचानक मृत्यू, नेमकं कारण काय?

टिकटॉक स्टार मेघाचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॉलोअर्स होते.
TikTok Star Megha Thakur Dies
TikTok Star Megha Thakur DiesDainik Gomantak

इंडो-कॅनडियन टिकटॉक स्टार मेघा ठाकूर हिचे अचानक निधन झाले. ती 21 वर्षांची होती. मेघा ठाकूरच्या निधनामुळे कुटुंबासह तिचे चाहतेही दु:खी झाले आहेत. मेघा ठाकूरच्या मृत्यूची माहिती पालकांनी सोशल मिडियावर दिली आहे. मेघाचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॉलोअर्स होते.

मेघा इस्टाग्रामवर (Instagram) डान्सचे आणि मोटीव्हेशनचे व्हिडीओ शेअर करत होती. अतिशय कमी वयात सोशल मीडियावर तिचे फॅनफॉलोअर्स तयार झाला होते. दरम्यान मेघाच्या वडिलांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिच्या निधनाची माहिती दिली. तिच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

तिच्या पालकांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “मेघा एक आत्मविश्वासू आणि आत्मनिर्भर तरुण मुलगी होती. ती तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम करत होती, म्हणून तिला तिच्या मृत्यूची माहिती सर्वांना हवी होती. यावेळी, आम्ही मेघासाठी तुमच्या प्रार्थना आणि संवेदना मागतो. पुढील प्रवासात तुमचे विचार आणि प्रार्थना तिच्यासोबत असतील. नेहमी तुझी खूप आठवण येईल.

मेघा ही मूळची मध्यप्रदेशातील इंदूर इथली राहणारी आहे. 2001 मध्ये तिचा जन्म झाला. तर ती एक वर्षाची असताना तिचे आई-वडील कॅनडाला स्थायिक झाले होते. मेघाचं शिक्षण कॅनडामध्येच पूर्ण झाले आहे.

चाहतेही भावुक झाले

मेघा ठाकूरच्या (Megha Thakur) पालकांच्या पोस्टनुसार, 24 नोव्हेंबर रोजी तिचे निधन झाले. ही भावनात्मक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मेघाचे चाहते तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर पोस्ट शेअर करत आहेत. यासह अनेक चाहत्यांनी मेघाच्या पालकांच्या पोस्टवर कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com