सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

बॉलिवूडचा प्रसिद्ध कलाकार सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कलाकार सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर सलमान खानचा चित्रपट "राधे-युआर मोस्ट वॉन्टेड भाई" चा टायटल ट्रॅक उद्या 5 मे रोजी रिलीज होणार आहे. या गोष्टीची माहिती स्वतः सलमान खानने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली आहे.( The title track of Radhe movie will be released on 5th May)

'ये जादू है जिन का’ मालिकेतील मुख्य अभिनेता विक्रम सिंह लग्नबंधनात अडकला

सलमान खानने (Salman Khan) आपल्या ऑफिशियल ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाच्या टायटल ट्रकची माहिती देताना "कल आएगा मोस्ट वॉन्टेड  फिल्म राधे (Radhe) का टायटल ट्रक" असे म्हणत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

चित्रपटाचे नव्या पोस्टरमध्ये सलमान खान काळ्या सूट मध्ये दिसतो आहे. याच पोस्टरवर दिलेल्या माहितीनुसार राधे चित्रपटाच्या टायटल ट्रकसाठी साजिद वाजिदच्या जोडीने संगीत दिले आहे. तर या गाण्याची कोरिओग्राफी मुद्स्सार खान यांनी केली असल्याचे समजते आहे.

चित्रपटाच्या इतर गोष्टींबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटात प्रसिद्ध कलाकार रणदीप हुडा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटातील सिन प्रभू देवा आणि मियोन्ग नामक कोरियन ऍक्शन दिग्दर्शकाच्या ने तयार केले आहेत.

संबंधित बातम्या