मनाला चटका लावून गेलेल्या सुशांतसिंग राजपूतचा आज वाढदिवस

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

पवित्र रीश्ता या सिरीयल मधील सर्वांचा लाडका मानव म्हणजेच बॉलिवूड स्टार सुशांतसिंग राजपूत यांचा आज जन्मदिन आहे.

21 जानेवारीचा हा बॉलीवूडसाठी खास दिवस आहे. पवित्र रीश्ता या मालिका मधील सर्वांचा लाडका मानव म्हणजेच बॉलिवूड स्टार सुशांतसिंग राजपूतचा आज जन्मदिन आहे. सुशांत कदाचित आज आपल्यात नसेल पण तो अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे.

त्याच्या चित्रपटांविषयी आणि मालिकांविषयी वारंवार चर्चा होत असतात, पण सुशांतचा दुसरा पैलू फार कमी लोकांना माहिती आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सुशांतला काही निवडक ठिकाणंचे फार आकर्षण होते, विशेष प्रेम होते. म्हणूनच त्याने चंद्रावर जमीन खरेदी केली होती. चंद्रावर जमीन खरेदी करणारा तो बॉलिवूडमधील पहिला अभिनेता होता. सुशांतने चंद्रावर प्लॉट विकत घेतला होता . बर्‍याच लोकांना याबद्दल आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. 2018 मध्ये त्याने चंद्रावर जमीन खरेदी केली.त्याच्याकडे एक विशेष प्रकारची अ‍ॅडव्हान्स दुर्बिणी 14LX00 होती. या दुर्बिणीद्वारे त्याला शनी रिंग्ज इतर ग्रह तारे बघायचा.

आंतरराष्ट्रीय संस्थांच्या म्हणण्यानुसार  ही जमीन कायदेशीररित्या कोणाच्याही मालकीची असल्याचे मानले जाऊ शकत नाही, कारण पृथ्वीच्या बाहेरील जग हा संपूर्ण मानव जातीचा वारसा आहे. तेव्हा कोणत्याही एका देशाचा किंवा नागरिकाचा हक्क त्या जमिनिवर असू शकत नाही.

एका मुलाखतीत बोलताना सुशांतने सांगितले होते की, “मी असे गृहित धरत आहे की, ज्या अनेक मार्गांनी आपण प्रश्नांची उत्तरे देतो ती शेवटी प्रश्नांची उत्तरेच असतात. तशाच प्रकारे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे वर्णन किंवा विचार वेगवेगळ्या प्रकारे करतो तेव्हा ते वास्तवात घडत जात असते. माझी आई म्हणायची की माझे आयुष्य एक कथा आहे जी मी स्वत:लाच सांगणार आहे. आज मी चंद्रावर जाण्याबद्दल बोलत आहे आणि मी आज चंद्रावर आहे."

दरम्यान गेल्या वर्षी 14 जूनला 34 वर्षीय सुशांत सिंग राजपूत याने वांद्रे येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देशाला आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.  या प्रकरणात, सीबीआय, ईडी आणि एनसीबी या देशातील बड्या एजन्सींनी तपास सुरू केला, परंतु अद्याप यावर कोणताही निष्कर्ष काढला गेलेला नाही. 

संबंधित बातम्या