Chalapathi Rao Passes Away: टॉलीवूडचा विनोदी, खलनायकी चेहरा काळाच्या पडद्याआड...

अ‍ॅक्टर चलपती राव यांंचं निधन झाल्याने तमिळ इंडस्ट्रीला एक मोठा धक्का बसला आहे.
Chalapathi Rao
Chalapathi RaoDainik Gomantak

टॉलिवूड अ‍ॅक्टर चलपती राव यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. 78 वर्षीय चलपती राव यांनी राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. 25 डिसेंबर रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला. या बातमीने त्यांच्या कुटूंबासह टॉलीवूडलाही धक्का बसला आहे. वेगवेगळ्या चित्रपटांतून मनोरंजन करणारे चलपती राव निघुन गेल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चलपति राव यांची तब्येत गेल्या बऱ्याच काळापासुन बिघडली होती. चलपती राव यांच्या जाण्याने त्यांची पत्नी आणि दोन मुलांना मोठा धक्का बसला आहे. वय झाल्यामुळे त्यांनी काम करणं सोडुन दिलं होतं.

Chalapathi Rao
Tunisha Suicide Case : तुनिषावर 26 डिसेंबरला अंत्यसंस्कार होणार; उशिरा होण्याचं हे आहे कारण

तेलुगु सिनेमात कॉमेडी अभिनेता आणि खलनायक म्हणुन त्यांनी आपला एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला होता. त्यांनी 600 पेक्षा आधिक चित्रपटांतुन आपल्या अभिनयाची चमक दाखवलेली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या चलपति यांचे 'साक्षी', 'ड्राइवर रामुडू' आणि 'वज्रम' हे सिनेमे खुप गाजले . सलमान खानच्या मध्यंतरी आलेल्या 'किक'चा ते एक महत्त्वाचा भाग होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com