टॉलिवूडच्या सुर्या सिंघमला कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

दक्षिण अभिनेता सूर्या शिवकुमारला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अभिनेता सुर्याने स्वत: आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे. 

तमिळनाडू: नवीन वर्षही आले आहे तसेच कोरोनाची लसही आली आहे पण तरीही लोक कोरोना आजाराचे बळी पडतच आहे. याच आजाराचे ताजे उदाहरण म्हणजे दक्षिण अभिनेता सूर्या शिवकुमारला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अभिनेता सुर्याने स्वत: आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे. तसेच, अभिनेताने असे म्हटले आहे की तो डॉक्टरांमार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे आणि निरोगी आहे, त्याच्या चाहत्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

त्यांच्या कोरोना संसर्ग झाल्याची बातमी देत ​​सूर्याने लिहिले- “मी कोरोना विषाणूने ग्रस्त आहे आणि माझ्यावर उपचार सुरू आहे.  परिस्थिती सध्या सामान्य झाली नाही. तेव्हा घाबरून चालणार नाही सुरक्षा आणि लक्ष घेणे महत्वाचे आहे. माझ्या चाहत्यांचे आणि सहाय्यक चिकित्सकांचे आभार प्रेम.

सुर्याने कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली तेव्हापासून दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेते कलाकार आणि चाहते त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. चित्रपट निर्माते राजशेखर पांडियन यांनी सोशल मीडियावर सांगितले की, 'प्रिय बंधूंनो अण्णा ठीक आहेत आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही'.

त्याने एकदा सिध्द करून दाखवावे की तो खलिस्तानी नाही -

महत्त्वाचे म्हणजे सूर्या हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. सूर्या ला कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत आगीसारखी पसरली, अशा परिस्थितीत सूर्याचे चाहते  त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत, त्याच्या चित्रपटांची चर्चा टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहे, सूर्याने नुकतेच मणिरत्नमच्या नवरस या चित्रपटाचे शुटिंग केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम मेनन यांनी केले आहे.

संबंधित बातम्या