जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे दुख:द निधन

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कवाडीमध्ये 6 डिसेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता.

पुणे :  मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात रसिकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुण्यातील राहत्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले.

सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कवाडीमध्ये 6 डिसेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील किर्तनकार होते. मराठी कवी कै. सुधीर मोघे यांचे थोरले बंधू होते.

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी सहजसुंधर अभिनयाचा ठसा उमटवला होता. प्रतिभासंपन्न नायक अशी ओळख श्रीकांत मोघे यांची होती. वसंत कानेटकर यांच्या 'लेकुरे उदडं झाली' या नाटकामधील राजशेखर उर्फ राजा, पु.ल. देशपांडे यांच्या 'वाऱ्यावरची वरात' मधील बोराटाके गुरुजी, वाऱ्यावरची वरात मधीलच 'दिल देके देखो' या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शमी कपूर शैलीत नृत्य करत रसिकांना मृनमुराद आनंद देणारे कलाकार अशी त्यांची ख्याती होती. 

संबंधित बातम्या