'हम दो, हमारे दो' म्हणत राजकुमार राव आणि क्रिती सेनन सांगणार अनोखी कहाणी

या चित्रपटाचा ट्रेलर 'फॅमिलीवाली दिवाली' टॅगलाईनसह रिलीज करण्यात आला आहे.
'हम दो, हमारे दो' म्हणत राजकुमार राव आणि क्रिती सेनन सांगणार अनोखी कहाणी
'हम दो, हमारे दो' म्हणत राजकुमार राव आणि क्रिती सेनन सांगणार अनोखी कहाणी Dainik Gomantak

अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि कृती सेनन (Kriti Sanon) स्टार 'हम दो, हमारे दो' या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. या चित्रपटात रत्ना पाठक शाह आणि परेश रावल, अपरशक्ती खुराना देखील आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूप मजेशीर आहे.

कृती सेनन आणि राजकुमार राव यांच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळाली. ट्रेलरमध्ये राजकुमार राव लग्नासाठी आई वडीलांच्या शोधात आहे. तेच अपारशक्ती खुरान त्याचवेळी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. चित्रपटामधील परेश रावल आणि रत्ना पाठकची भूमिका खास आहे. परेश रावल चित्रपटामध्ये वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या कॉमेडी - रोमॅंटिक चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जैन यांनी केले आहे आणि दिनेश वीजनच्या हाऊस मैडॉक प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाची निर्मिती केली.

'हम दो, हमारे दो' म्हणत राजकुमार राव आणि क्रिती सेनन सांगणार अनोखी कहाणी
Birthday Special: या दोन घटनांमुळे बिग बी बनले 'सुपरस्टार'

चित्रपटाबद्दल बोलतांना दिग्दर्शक दिनेश विजान म्हणाले, " मॅडाॅक आशय-आधारित चित्रपटांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो.तर 'मिमी' हा एक मनोरंजक कौटुंबिक चित्रपट होता. हम दो हमारे दो, हा चित्रपट सुद्धा कौटुंबिक आहे. यात कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी आहे. आम्ही तुमच्यासाठी एक विनोदी चित्रपट घेवून आलो आहोत, जो सर्वांना आवडेल. या चित्रपटाचा ट्रेलर 'फॅमिलीवाली दिवाली' टॅगलाईनसह रिलीज करण्यात आला आहे. यामुळे असे जाहीर होते की हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर 29 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.