आता पडद्यावर शीलाचा नाही तर 'इंदू की जवानी'चा होणार जलवा...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

ट्रेलरमध्ये तरी भन्नाट वाटणाऱ्या या भन्नाट सिनेमात काय काय आहे जाणून घेऊया...

लवकरच एक प्रेक्षकांच्या भेटीला एक रोमॅन्टीक सिनेमा येत आहे. कियारा आडवाणी हिची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाचे नाव 'इंदू की जवानी' असे आहे. इंदू म्हणजेच इंदिरा गुप्ता, एक तरूणी असून आपल्यासाठी एक मुलगा शोधत आहे. तिच्या प्रेमाच्या आयुष्याबद्दल बोलणाऱ्या या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. ट्रेलरमध्ये तरी भन्नाट वाटणाऱ्या या भन्नाट सिनेमात काय काय आहे जाणून घेऊया...

 संहिता कशी आहे ? 

'इंदू की जवानी' या सिनेमात इंदिरा गुप्ता नावाची एक अतरंगी मुलगी असून ती दिल्लीत राहते. तिच्या आयुष्यात एका परफेक्ट मुलाच्या ती शोधात आहे. कधी टिंडरवर स्वाईप करून मुलांना डेट करते तर कधी आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या सल्ल्याने वागते. आजच्या जगात चांगली मुले शोधून सापडत नाहीत हे तिचे प्रामाणिक मत आहे. असे मत असणाऱ्या इंदूच्या घरात आणि आयुष्यात एका पाकिस्तानी मुलाची एन्ट्री होते आणि तिथून गोष्टीत ट्वीस्ट येतो. इंदूला याबाबतील पहिल्यांदा समजते तेव्हा ती त्याला आतंकवादी ठरवून टाकते.    

या सिनेमाच्या ट्रेलरमधून तरी तो विनोद आणि उपरोधाने भरलेला आहे, असेच दिसून येते. ज्यात इंदू आपल्या प्रेमाच्या गोष्टी पुढे नेण्याचा पूरेपूर प्रयत्न करत असून दुसरीकडे पाकिस्तानी आणि मुसलमानांवर केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवरही कटाक्ष टाकण्यात आला आहे. 

 प्रमुख भूमिकांमध्ये कोण आहेत? 

अतिशय महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या कियारा आडवाणी सोबत ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ मधील आदित्य सील हाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच कॉमेडियन आणि अभिनेत्री मल्लिका दुआ हीदेखील या चित्रपटात मोठी भूमिका साकारणार आहे.  अबीर सेन गुप्ता याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून गायक मिका सिंग याने या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.  

संबंधित बातम्या