कोविड-१९ विरोधात लढणा-या देशाला एक संगीतमय मानवंदना

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

या गाण्‍यासाठी भारतभरातील संगीतकार एकत्र आले आहेत. या गाण्‍यामध्‍ये प्रतिष्ठित कलाकारांचा समावेश आहे,

मुंबई

एचडीएफसी बँकेने आज आशेचे सहयोगात्‍मक गाणे आम्‍ही हार मानणार नाही सादर केले. हे गाणे भारताचा अतुलनीय उत्‍साह आणि कोविड-१९ महामारीविरोधात सहयोगाने
लढणा-या लाखो भारतीयांना एक मानवंदना आहे.
ऑस्‍कर व ग्रॅमी पुरस्‍कारप्राप्‍त संगीतकार ए.आर. रेहमान यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे आणि प्रख्‍यात गीतकार व कवी प्रसून जोशी यांनी हे गीत लिहिले आहे. या गाण्‍यासाठी भारतभरातील संगीतकार एकत्र आले आहेत. या गाण्‍यामध्‍ये प्रतिष्ठित कलाकारांचा समावेश आहे, जसे क्लिंटन केरेजो, मोहित चौहान, हर्षदीप कौर, मिका सिंग, जोनिता गांधी, नीती मोहन, जावेद अली, सिद श्रीराम, श्रुती हसन, साशा तिरूपती, खतिजा रेहमान व अभय जोधपूरकर. भारताचा प्रमुख तालवादक शिवमणी,
सितारवादक असद खान आणि बास प्रॉडिगी मोहिनी डे हे देखील या प्रख्‍यात प्रकल्‍पाचे भाग आहेत.
हे गाणे आशा, सकारात्‍मकता व प्रेरणेच्‍या प्रसाराला चालना देण्‍यासाठी संकल्पित आहे. हे प्रबळ, भावनिक गाणे लोकांना आठवण करून देते की आपण सर्व या लढ्यामध्‍ये एकत्र आहोत आणि आपण सहयोगाने या संकटावर मात करू. हे गाणे सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये दिसून येणारे दयाळूपणाचे कृत्‍य, आशा,
पाठिंबा, शौर्य व काळजी अशा अनेक बाबी दाखवते. या गाण्‍याच्‍या माध्‍यमातून एचडीएफसी बँक अधिकाधिक लोकांना पीएम-केअर्स फंडामध्‍ये दान करण्‍यास
प्रोत्‍साहित करत देशाप्रती त्‍यांची एकता व समर्थन दाखवू इच्छिते. प्रत्‍येक दान आमूलाग्र बदल घडवून आणते आणि बँक सर्वांना दान करण्‍याचे आवाहन करते. बँक सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येकवेळी शेअर करण्‍यात येणा-या गाण्‍यासाठी ५००/- रूपये दान करणार आहे. या लहानशा कृत्‍यामुळे मोठ्या प्रमाणात निधी जमा होईल आणि हा निधी एचडीएफसी बँकेकडून पीएम-केअर्स फंडमध्‍ये दान करण्‍यात येईल. या महिन्‍याच्‍या सुरूवातीला एचडीएफसी बँकेने पीएम-केअर्स फंडमध्‍ये १५० कोटी रूपये दान केले. एचडीएफसी बँकेचे मुख्‍य विपणन अधिकारी रवी संथनाम म्‍हणाले, एक सामाजिक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्‍हणून आमची आपल्‍या देशाप्रती सर्वोत्तम योगदान देण्‍याची इच्‍छा आहे. संगीत हे वैश्विक आहे आणि संगीतामधून उत्‍साह वाढण्‍यासह मन प्रसन्‍न होते. या मानवंदनेच्‍या माध्‍यमातून देशातील प्रत्‍येक
व्‍यक्‍तीच्‍या मनाला स्‍पर्श करण्‍याचा आणि त्‍यांना ते एकटे नसल्‍याची जाणीव करून देण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. सहयोगाने आपण सक्षमपणे यशस्‍वी ठरू. सध्‍याच्‍या घडीला प्रत्‍येक योगदान देशाच्‍या महामारीविरोधातील लढ्याला चालना देते. आम्‍ही आपल्‍या देशवासीयांच्‍या अतूट उत्‍साहाला सलाम करतो. आम्‍ही कोविड-१९चे निराकरण करण्‍यासाठी साह्य करण्‍याची आणि पाठिंबा देण्‍याची आमची
कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत.

संगीतकार ए. आर. रेहमान म्‍हणाले, या गाण्‍याने आम्‍हा सर्वांना थोर कार्यासाठी एकत्र येण्‍यास शिकवले आहे. आम्‍ही आशा करतो की, हे गाणे देशातील सर्व नागरिकांना देखील एकत्र येण्‍यास प्रेरित करेल. या म्‍युझिक व्हिडिओच्‍या प्रत्‍येक शेअरसाठी पीएम केअर्स फंडमध्‍ये योगदान देण्‍याची कटितद्धता दाखवलेल्‍या एचडीएफसी बँकेचे आभार.
गीतकार प्रसून जोशी म्‍हणाले, ए. आर. रेहमानसोबत सहयोग जोडताना नेहमीच चांगले वाटते. आम्‍ही एकत्र संस्‍मरणीय कलाकृती निर्माण केल्‍या आहेत. मला आनंद होत आहे की, एचडीएफसी बँक या अनपेक्षित काळामध्‍ये आमच्‍याशी सहयोग जोडत आहे. सर्जनशीलतेसाठी ही योग्‍य वेळ नसली तरी, कलाकार म्‍हणून आम्‍ही प्रतिकूल स्थितीवर मात करण्‍यासाठी आणि आशेचा किरण दाखवण्‍यासाठी साह्य करत आहोत.
माझी कविता अतूट मानवी चैतन्‍याभोवती केंद्रित आहे. आम्‍हाला अजून बरेच काही शिकायचे आहे, पण सहयोगाने आम्‍ही विषमतेवर मात करू, आम्‍ही हार मानणार नाही. 
एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाने या मोहिमेची संकल्‍पना मांडण्‍यात आली आहे आणि त्‍यांचे क्रिएटिव्‍ह एजन्‍सी भागीदार किनेक्‍ट व डिजिटल मीडिया कंपनी क्‍यूकीने ही संकल्‍पना प्रत्‍यक्षात आणली आहे.

संबंधित बातम्या