24 अफेअरनंतर झालं खरं प्रेम; अनिल कपूर यांची भन्नाट लव स्टोरी

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

सन 2018 मध्ये ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अनिलने आपल्या प्रेमकथेविषयी अनेक खुलासे केले होते.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीच्या कॉरिडोरमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत, ज्या लोकांसाठी एक उदाहरण आहेत. पहिल्या नजरेत प्रेम, नंतर ग्रहण आणि नंतर लग्न हे केवळ चित्रपटांमध्येच घडत नाही, तर वास्तविक जीवनातही घडते. अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी जेव्हा सुनीता कपूरला पहिल्यांदा पाहिले तेव्हा असेच काहीसे घडले. पहिल्यांदा पाहिल्यानंतर अनिल कपूरने सुनीताला आपले हृदय देऊन (Anil-Sunita Lovestory) टाकले. ​​अनिल यांना प्रथम सुनीतापर्यंत पोहोचणे फार कठीण गेले. अखेर अनिल यांनी हार न मानता सुनीताला आपल्या प्रेमात पाडले. आज अनिल आणि सुनीता यांच्या लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले असून दोघांचे एकमेकांवर असणारे प्रेम आजही तेवढेच आहे .तर आपण आज अनिल आणि सुनीताच्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

Happy Birthday Nawazuddin Siddiqui: यांचे पाच प्रसिद्ध डायलॉग

लग्नाआधी होत्या 25 गर्लफ्रेंड 
अनिल कपूरने लग्नाआधी बर्‍याच मुलींना डेट केले होते. अर्जुन कपूर सोबत एका मुलाखतीमध्ये अनिल यांनी सांगितले त्यांनी शालेय जीवनापासून त्यांनी मौज-मस्ती सुरु केली होती. अनिल यांना अजिबात अभ्यास करायला आवडत नव्हते, म्हणून ते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसायचा.तेव्हा त्यांनी 3-4 मुलींना डेट केले होते.  त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये 20-25 मुली त्यांच्या गर्लफ्रेंड बनल्या, परंतु सुनीता या त्यापैकी सर्वोत्कृष्ट होत्या. ते दोघे पहिले मित्र झाले आणि मग त्यांनी लग्न केले असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

अनिल- सुनीता यांची पहिली भेट
सन 2018 मध्ये ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अनिलने आपल्या प्रेमकथेविषयी अनेक खुलासे केले होते. अनिल सुनीताला पहिल्यांदा कसे भेटले ते सांगितले होते आणि मग प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. सुनीताचा नंबर अनिल यांना त्यांच्या एका मित्राने दिला होता.  पण जेव्हा अनिल सुनीताशी बोलले तेव्हा ते त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले. यानंतर ते एका पार्टीत भेटले आणि अनिल पहिल्याच भेटीत सुनीताच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले आणि दोघे मित्र बनले. यापूर्वी अनिल सुनीताशी दुसऱ्या एक आवडलेल्या मुलीबद्दल बोलत असे. पण त्यानंतर त्या मुलीने अनिल यांना धोका दिला आणि अनिल आणि सुनीता यांची बाँडिंग मजबूत झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

सुनीता उचलायच्या अनिल यांचा खर्च
आज अनिल कपूर कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत. परंतू, अनिल कपूर यांच्याकडे स्ट्रगलिंग डेजमध्ये टॅक्सी भाड्याला पैसे नव्हते. सुनीता त्यांचा मोठा खर्च उचलत असे. त्यावेळी अनिल कूपर यांची वेळ काही खास नव्हती, त्यांच्याकडे टॅक्सिचे भाडे द्यायला ही पैसे नव्हते. तेव्हा सुनीता अनिल यांना पैसे देत असे. अनिल कपूर सुनीताला भेटण्यासाठी तासंतास बसने प्रवास करून जायचे.

एकाच दिवसात केले होते लग्न 
यावेळी अनिल कपूर यांनी फार संघर्ष केला आणि सुनिताने त्यांना खूप सपोर्ट केला. त्यानंतर 1985 मध्ये जेव्हा अनिल कपूरला 'मेरी जंग' मधून मोठा ब्रेक मिळाला तेव्हा त्यांनी सुनीताला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 17 मे 1984 रोजी चित्रपट साइन केला, 18 मे ला त्यांनी सुनीताला प्रपोस केला आणि 19 मे रोजी दोघांनी लगेच लग्न केले.  लग्नाच्या आधी सुनीताने स्वयंपाकघरातील कामे न करण्याची अट दिली होती. मग अनिल कपूर यांना मेरी जंग चित्रपट मिळाला, तेव्हा त्यांनी घरात नोकर ठेवला आणि मग त्यांनी प्रपोस केला. सुनीताने असे सांगितले होते की लग्न लगेच दुसऱ्या दिवशी करायचे नाहीतर कधीच नाही. अनिल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकदा आपल्या लव्ह स्टोरीचा उल्लेख केला आहे. अनिल यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.  

संबंधित बातम्या