Vicky Kaushal’s आणि कतरिना कैफ यांच्या साखरपुड्याचा झाला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या साखरपुड्याबद्दल इंटरनेटवर अफवा पसरत होत्या
Vicky Kaushal’s आणि कतरिना कैफ यांच्या साखरपुड्याचा झाला खुलासा
vicky Kaushal and Katrina KaifDainik Gomantak

गेल्या काही दिवसात विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या साखरपुड्याबद्दल (Engagement) इंटरनेटवर अफवा पसरल्या होत्या. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याची एकच चर्चा होती, यातच विक्की कौशलच्या आई -वडिलांनी सुद्धा मस्करीमध्ये त्याच्याकडे दोघांच्या साखरपुड्याच्या अफवांवर (Rumors) 'मिठाई' मागितली, काही दिवसांपूर्वी, विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या साखरपुड्याच्या अफवा इंटरनेटवर पसरल्या होत्या. एका नवीन मुलाखतीत विकीचा धाकटा भाऊ सनी कौशलने त्याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया उघड केली आहे.

vicky Kaushal and Katrina Kaif
Shilpa Shetty च्या घरी उत्साहात 'गणरायाचे' आगमन

सनीने खुलासा केला की, त्याच्या आईवडिलांनीसुद्धा विक्की कौशलची कतरिना कैफसोबतच्या साखरपुड्याबद्दल कशी मस्करी केली “मला आठवते सकाळी अफवा येऊ लागल्या तेव्हा विकी जिमला गेला होता. जेव्हा तो घरी परत आला, तेव्हा आई आणि वडिलांनी त्याला मजेदारपणे विचारले, 'अरे यार, तुझा साखरपुडा झाला, मिठाई तरी खाऊ घाल" यावर त्याच्या आई -वडिलांना उत्तर देताना विक्की कौशल म्हणाला, "जितका खरा साखरपुडा झाला आहे, तितकी खरी मिठाई खा".यावर सनी कौशल पुढे म्हणाला, "ही अफवा कोठून आली हे आम्हाला माहित नाही, परंतु आम्ही सर्व या कारणाने खूप हसत होतो."

vicky Kaushal and Katrina Kaif
Deepika Padukone का होती डिप्रेशनमध्ये? केला स्वतः खुलासा

दरम्यान, विक्की कौशल आणि कतरिना कैफ 2019 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत परंतु अद्याप याबद्दल बोलले नाहीत. त्यांच्या साखरपुड्याच्या अफवा फेटाळून लावत, कॅटच्या PA ने या बद्दल खुलासा करत सांगितले की, “अद्याप कोणताही साखरपुडा समारंभ झाला नसून ती लवकरच टायगर 3 च्या शूटसाठी रवाना होत आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तुर्कीमध्ये असून, सलमान खानसोबत टायगर 3 चे शूटिंग करत आहे. या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com