Arrested: करण मेहरा आणि निशा रावल का,'ये रिश्ता क्या कहलाता है'?

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. आता करण मेहराला पत्नी निशा रावल हीच्याबरोबर घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है(Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेमधील नैतिक सिंघानिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या करण मेहरा(Karan Mehra) याला त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने(Nisha Rawal) काल (31 मे) रात्री गोरेगावमध्ये तक्रार दिल्यानंतर टीव्ही अभिनेता करण मेहराला गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्याला आपल्या पत्नीसोबत भांडण करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. करण मेहरा हा हिंदी टीव्ही जगातला एक प्रसिद्ध आणि आवडता चेहरा आहे. स्टार प्लस वरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे तो घरोघरी पोहोचला होता. आणि त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेत तो नैतिकच्या मुख्य भुमिकेत होता. याशिवाय त्याने बिग बॉस हिंदी स्पर्धेतही सहभाग घेतलेला आहे. (TV actor Karan Mehra arrested in domestic violence case)

टार्झन स्टार जो लारा यांचा 58 व्या वर्षी विमान अपघातात मृत्यू 

पत्नीसोबत भांडण केले आणि तिला मारहाण केल्यामुळे आता हा अभिनेता अडचणीत सापडला आहे. पत्नीला मारहाण केल्यानंतर करणच्या पत्नीने लगेच गोरेगाव पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. आणि त्यानंतर रात्रीच त्याला पोलिसांमार्फत अटक करण्यात आली. आज मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील कारवाई आणि सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून करण आणि त्याची पत्नी निशा यांच्या वैवाहिक नात्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याची माहिती समोर येत होती. एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळेच त्यांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली अशी माहिती समोर येत होती परंतु, त्या दोघांनीही वेळोवेळी या वृत्तांचं खंडन करण्यात आले.

5G Technology: जूही चावला भारतातील 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध 

अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. आता करण मेहराला पत्नी निशा रावल हीच्याबरोबर घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या करण मेहरा गोरेगाव पोलिस ठाण्यात असून मुंबई पोलिस त्याचा बयान नोंदवित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून करण मेहरा आणि निशा रावल यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त आहे. याविषयी या कपलशीही बोलले गेले. पण अभिनेत्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला. आणि निशा रावल नेही सर्व अफवा नाकारल्या होत्या आणि सांगितले होते की आमच्यात सर्व काही ठीक आहे. करणच्या अटकेवरून आता हे स्पष्ट झाले आहे की या कपलमध्ये कीती गोष्टी ठीक आहेत.

संबंधित बातम्या