चित्रपटासाठी अभिनेत्रीसमोर दिग्दर्शकाने ठेवली 'ही' अट

कारकिर्दीतील चढ-उतारांसोबतच स्नेहाने (Sneha Jain) ई-टाइम्सला नकाराबद्दलही सांगितले होते.
चित्रपटासाठी अभिनेत्रीसमोर दिग्दर्शकाने ठेवली 'ही' अट
Sneha JainDainik Gomantak

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'साथ निभाना साथिया' फेम स्नेहा जैन (Sneha Jain) शोमध्ये गहनाची भूमिका साकारत आहे. अलीकडेच, तिने एका मुलाखतीदरम्यान कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल मोकळेपणाने सांगितले. स्नेहा म्हणाली की, मला दक्षिणेतील एका प्रोजेक्टसाठी तडजोड करण्यास सांगितले होते. कारकिर्दीतील चढ-उतारांसोबतच स्नेहाने ई-टाइम्सला नकाराबद्दलही सांगितले होते.

स्नेहा ही गोष्ट म्हणाली

स्नेहा पुढे म्हणाली, एकदा एका दिग्दर्शकाने माझ्यासमोर एक पोजिशन ठेवली आणि सांगितले की, मी त्याची आवश्यकता पूर्ण केली तरच मला ते मिळेल. मला दक्षिणच्या एका कास्टिंग डायरेक्टरने बोलावले होते. त्याने मला एका कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची ऑफर दिली होती. ते म्हणाले की, या चित्रपटामध्ये तीन कपल्स असतील आणि तिघांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे. मी त्यांना माझे प्रोफाइल आणि फोटोग्राफ्स पाठवले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितले की, मला दिग्दर्शक आणि निर्मात्याला भेटण्यासाठी हैदराबादला यावे लागेल. स्नेहा त्यावेळी चित्रपट निर्मात्यांना भेटायला जाण्यास तयारही झाली, परंतु त्याआधी तिने सांगितले की, जर मला या प्रकल्पाबद्दल आणखी काही माहिती मिळाली तर अधिक चांगले होईल. त्याचबरोबर स्नेहाने त्यांना सांगितले की, मी माझ्या आईबरोबर प्रवास करेन. त्यावर कास्टिंग डायरेक्टरने मला सांगितले की, मला संपूर्ण दिवस दिग्दर्शकासोबत घालवावा लागेल आणि त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करावे लागेल. त्यांच्याशी तडजोड करावी लागेल. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. तो पुढे म्हणाला की, तुम्ही ज्या दिवशी हैदराबादला आलात, त्या दिवशी हॉटेल संबंधी माहिती तुमच्याकडे येईल, त्यानंतर मला दिग्दर्शकाला भेटावे लागेल. तसेच आवश्यक पेपर्सवर स्वाक्षरी केल्यानंतर, मला आधीपासूनच ठरलेली अर्धी रक्कम आणि चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यावर राहिलेली रक्कम मिळेल, असे सांगण्यात त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Sneha Jain
'रंगीला' गाण्याबाबत उर्मिला मातोंडकरचा खुलासा, जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटेल

दरम्यान, स्नेहा त्यावेळी चित्रपट निर्मात्यांना भेटायला जाण्यास तयार झाली, परंतु त्याआधी तिने सांगितले की, जर मला या प्रकल्पाबद्दल आणखी काही माहिती मिळाली तर अधिक चांगले होईल. आणि मी माझ्या आईबरोबर प्रवास करेन. त्यावर कास्टिंग डायरेक्टरने मला सांगितले की, मला संपूर्ण दिवस दिग्दर्शकासोबत घालवावा लागेल आणि त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करावे लागेल. तसेच त्यांच्याशी तडजोडही करावी लागेल. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. तो पुढे म्हणाला की, तुम्ही ज्या दिवशी हैदराबादला (Hyderabad) आलात, त्या दिवशी हॉटेलसंबंधी माहिती तुमच्याकडे येईल, त्यानंतर मला दिग्दर्शकाला भेटावे लागेल. तसेच आवश्यक पेपर्स पूर्ण केल्यानंतर मला आधी ठरलेली अर्धी रक्कम आणि चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर राहिलेली रक्कम मिळेल, असे सांगण्यात त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.