प्रसारणमंत्र्यांनी ५१ व्या इफ्फीतील इंडियन पॅनोरमातील चित्रपटांची केली घोषणा

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

५१ व्या इफ्फीतील इंडियन पॅनोरमातील चित्रपटांची घोषणा आज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी  ट्विटद्वारे केली. या यादीमध्ये तीन मराठी चित्रपट आणि तीन मराठी लघुपट आहेत. 

पणजी: संपूर्ण जगभरासह गोव्यावरही कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे दरवर्षी राज्यात होणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षी पुढे ढकलण्यात आला होता. ५१ व्या इफ्फीतील इंडियन पॅनोरमातील चित्रपटांची घोषणा आज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी  ट्विटद्वारे केली. या यादीमध्ये तीन मराठी चित्रपट आणि तीन मराठी लघुपट आहेत. 

निवड झालेल्या मराठी निर्मितींमध्ये  जून (दिग्दर्शक वैभव किश्ती, सुॠद गोडबोले), प्रवास (दिग्दर्शक शशांक उडापूरकर), कारखानीसांची वारी (दिग्दर्शक मंगेश जोशी) या मराठी चित्रपटांची आणि खिसा (दिग्दर्शक राज मोरे), पांढरा चिवडा (दिग्दर्शक हिमांशू सिंह), स्टील अलाईव्ह (दिग्दर्शक ओंकार दिवाडकर) या तीन मराठी लघुपटांचा समावेश आहे.

यावर्षी मल्याळममधून सेफ (दिग्दर्शक प्रदीप कलीपुरयथ), ट्रान्स (दिग्दर्शक अन्वर रशिद), केट्टीयोलानू एन्टे मलखा (दिग्दर्शक निसाम बशीर), ताहिरा (दिग्दर्शक सिद्दक परवूर), कपेला (दिग्दर्शक मुहम्मद मुस्तफा) या पाच सिनेमांचा आणि ओरू पथिरा स्वप्नम् पोळे (दिग्दर्शक शरण वेणुगोपाळ) या लघुपटाची निवड झाली आहे. 

यादीत असणाऱ्या इतर चित्रपटांमध्ये ब्रिज (आसामी) अविजात्रिक (बंगाली), ब्रह्म जाने गोपोन कोमोटी (बंगाली), अ डॉग अ‍ॅण्ड हिज मॅन (छत्तीगढी), अप, अप अ‍ॅण्ड अप (इंग्लीश), आवर्तन (हिंदी), सांड की आंख (हिंदी), पिंक एली? (कन्नड), एगी कोना (मणिपुरी), कलिरा अतिता (उडिया), नमो (संस्कृत), थाएन (तमिळ), गतम् (तेलुगू), असुरन (तमिळ), छिछोरे (हिंदी) या चित्रपटांचा समावेश आहे.

निवड झालेल्या लघुपटांमध्ये हंड्रेड इअर्स ऑफ क्रिस्तोमस (इंग्लीश), अहिंसा-गांधी : द पॉवर ऑफ द पॉवरलेस (इंग्लीश), कॅटडॉग (हिंदी), ड्रामा क्विन्स (इंग्लीश), ग्रीन ब्लॅकबेरीज् (नेपाळी), हायवेस ऑफ लाइफ (मणिपुरी), होली राईट (हिंदी), इन अवर वर्ल्ड (इंग्लीश), इन्वेस्टिंग लाईफ (इंग्लीश), जादू (हिंदी), जात आई बसंत (पहाडी/हिंदी), जस्टिज डिलेड बट डिलिव्हर्ड (हिंदी), पांचिका (गुजराती), राधा (बंगाली), शांताबाई (हिंदी), द फोरटीन्थ फेब्रुवारी अ‍ॅण्ड बियॉण्ड (इंग्लीश) यांचा समावेश आहे.

आणखी वाचा:

गौहर खान आणि जैद दरबारचं डिजीटल वेडिंग कार्ड बघितलंत का ? -

संबंधित बातम्या