Uorfi Javed Video: उर्फीच्या अंगावर फक्त दोन निळे पंख...नव्या ड्रेसवर लोकांच्या अतरंगी प्रतिक्रिया..व्हिडीओ बघुन तुमची शुद्ध हरपेल...

अभिनेत्री उर्फी जावेद आता तिच्या नव्या ड्रेसने चर्चेत आली आहे.
Uorfi Javed
Uorfi JavedDainik Gomantak

उर्फी जावेद कुणाला माहित नाही असा माणुस सोशल मिडीयावर शोधुन सापडणार नाही. कपड्यांची अतरंगी स्टाईल आणि बेधडक बोलण्यामुळे उर्फी सतत चर्चेत असते. गेले काही दिवस ती सातत्याने चर्चेत आहे.

आता ती पुन्हा एकदा त्याच कारणाने चर्चेत आली आहे ज्या कारणामुळे तिची ओळख आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असुन यातले तिचे कपडे अत्यंत विचित्र आहेत. या कपड्यात तिच्या शरीराचे काही भाग झाकलेले आहेत.

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे सतत वादात सापडत असते. सोशल मिडीयावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या अकाउंटवरुन ती एकाहून एक पोस्ट शेअर करत असते. आणि लोकांच्या टीकेची शिकार बनत असते. कधी ती नखांनी तर कधी दोरीने शरीर झाकताना दिसते . एकदा तर तीने स्वत:ला सायकलच्या साखळीने झाकून घेतल्याचं फोटो शूट केलं होतं. 

रणवीर सिंगपासून ते मसाबा गुप्तापर्यंत सर्वांनी तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केले आहे. आता पुन्हा एकदा ती एका वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसली आहे, ज्याला पाहून लोक तिला काय म्हणायचे असा प्रश्न विचारत आहेत.

उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने छातीवर दोन मोठे शिंगाच्या आकाराचे पंख लावले आहेत आणि खाली एक स्कर्ट घातला आहे, जो बाजूने चिरलेला आहे. एकूणच, ती एक निळी परी वाटत आहे.

आता हे पाहिल्यानंतर युजर्स शांत बसणं शक्यच नाही. ते प्रश्न विचारत आहेत - या ड्रेसला काय नाव देऊ? काहीजण म्हणत आहेत - हे कसलं स्वातंत्र्य आहे, नग्न फिरण्याचं. उर्फी जावेदला या सर्व गोष्टींचा काहीही फरक पडत नाही आक्षेप नसला तरी. ती तिच्या सुरात तल्लीन असते.

Uorfi Javed
Rashmika- Rishab Shetty: रश्मिका आणि कांतारा फेम ऋषभमध्ये कसलं भांडण सुरूय...एकमेकांवर करतायत आरोप

सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तक्रार केल्याने उर्फी पोलिस ठाण्याच्या फेऱ्याही मारत आहे. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सनंतर उर्फीने आपली बाजू मांडली आहे. तीच्या मते ती एक मुक्त नागरिक आहे आणि तीला तीच्या आवडीचे कपडे घालण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं ती सांगते. 

उर्फी म्हणते "मला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात आणि हा काही गुन्हा नाही. जेव्हा मी शूटसाठी बाहेर जाते तेव्हा पापाराझी माझे फोटो क्लिक करतात आणि व्हिडिओ बनवतात आणि ते व्हायरल होतात. यात माझी कोणतीही चूक नाही.

उर्फीने शेअर केलेला हा व्हिडीओ एकदा जरूर बघा. आपल्या बेधडक वागण्या बोलण्याने उर्फी सतत चर्चेत असते. तिला विरोध करणारेही फॅन्स आहेत आणि तिच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावावर फिदा असणारे फॅन्सही आहेत.उर्फीच्या या व्हिडीओवर आता चित्रा वाघ काय बोलता त याची काही युजर्स आतुरतेने वाट बघत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com