Independence Day: भारताच्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकन गायिका गाणार राष्ट्रगीत

75th Independence Day: आफ्रिकन-अमेरिकन गायिका मेरी मिलबेन, ज्यांनी "ओम जय जगदीश हरे" आणि "जन गण मन" मध्ये सुधारणा करून अनेक भारतीय प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.
Independence Day| Mary Milben
Independence Day| Mary Milben Dainik Gomantak

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच हॉलिवूड सेलिब्रिटी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित रादणार आहे. तसेच भारताचे राष्ट्रगीत गाणार आहे. माहिती देताना इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनने म्हटले आहे की, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (75th Independence Day) अमेरिकन-आफ्रिकन गायिका मेरी मिलबेन उपस्थित राहणार असून भारताचे राष्ट्रगीत गाणार आहेत. (Mary Milben Will Attend India's 75th Independence Day News)

15 ऑगस्टला यंदा सर्वात भव्य कार्यक्रम होणार आहे. कारण ते स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आहे. ब्रिटिश राजवटीत भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या खास प्रसंगी हॉलिवूड(Hollywood) गायिका मेरी मिलबेन (Mary Millben) हिला आमंत्रित करण्यात आले आहे. जी देशासमोर लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात 'ओम जय जगदीश हरे' आणि 'जन गण मन' गाणार आहे.

Independence Day| Mary Milben
Friendship Day निमित्त मित्रांसोबत बघा हे खास चित्रपट, जुन्या आठवणी होणार ताज्या

ICCR ने सांगितले, मेरी मिलबेन भारताची अधिकृत पाहुणी असेल आणि तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच भारतात (India) परफॉर्म करणार आहे. मेरी मिलबेन ही पहिली अमेरिकन कलाकार आहे. ज्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त परफॉर्म करण्याची संधी मिळत आहे. मेरी मिलबेन अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे

* मेरी मिलबेन यांनी आनंद व्यक्त केला

लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी भारतात आल्यावर मेरी मिलबेन म्हणाल्या – भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाला उपस्थित राहण्यासाठी 1959 मध्ये भारताला भेट देणाऱ्या डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या पावलावर पाऊल ठेवत मला खरोखर अभिमान वाटतो.

अशा मौल्यवान मातृभूमीचा अनुभव घेण्यासाठी आणि जगभरातील भारत आणि भारतीय समुदायासोबतचे आमचे चांगले संबंध साजरे करण्यासाठी यूएसए आणि भारत यांच्यातील महत्त्वाची लोकशाही युती आणखी मजबूत करताना मला आनंद होत आहे. मेरी मिलबेनही लखनऊला भेट देणार आहेत. मेरी मिलबेन म्हणाल्या की मी माझ्या भारताच्या पहिल्या प्रवासाबद्दल खूप उत्साहित आहे. मला डॉ. किंगचे शब्द पुन्हा सांगायचे आहेत "इतर देशांमध्ये मी पर्यटक म्हणून जाऊ शकते, परंतु भारतात मी यात्रेकरू म्हणून येते" दिल्लीत त्यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर मेरी मिलबेन उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊलाही जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com