
फ्रेंडशिप डेच्या (Friendship Day) निमित्ताने अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी त्यांच्या आगामी 'उचाई' या चित्रपटाचा फर्स्ट लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या चित्रपटात बीग बीं शिवाय बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा एकत्र दिसून येणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे तसेच चित्रपटाच्या रिलीजपूर्वी, अमिताभ यांनी अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत त्यांच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला, बिग बींनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर याचे पोस्टर शेअर केले आहे. (Uunchai First Look Amitabh Bachchan shared the first look of Uunchai on Friendship Day)
त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'उचाई'चे पहिले पोस्टर शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, "आमच्या आगामी राजश्री चित्रपट 'उचाई'च्या फर्स्ट लूकसह फ्रेंडशिप डे साजरा करा. अनुपम खेर आणि बोमन इराणी यांची मैत्री साजरी करणाऱ्या प्रवासात माझ्यासोबत तुम्हीही सामील व्हा. राजश्री आणि सूरज बडजात्या यांचा हा चित्रपट आहे, तसेच 11 नोव्हेंबर 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
'उचाई'चे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले आहे आणि सूरज कौटुंबिक चित्रपटांसाठी ओळखला जातो. तसेच सूरजने यापूर्वी 2015 मध्ये आलेल्या 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात सलमान खान आणि सोनम कपूर आहुजा मुख्य भूमिकेमध्ये दिसून आले होते. याशिवाय स्वरा भास्कर आणि नील नितीन मुकेश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या आणि 'अल्टीट्यूड'मधून तो दिग्दर्शनाच्या दुनियेत पुनरागमन करत आहे.
अनुपम खैर यांनी रॅप अप फोटो शेअर केला
अनुपम खेर यांनी एप्रिलमध्ये 'उचाई'चे शूटिंग संपल्याची घोषणा केली तसेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रॅप अप फोटोही शेअर केला आहे. हे कृष्णधवल चित्र होते तसेच या चित्रात अनुपम खेर, अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि बोमन इराणी कारमध्ये बसलेले दिसून येत आहेत.
या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबरला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय बिग बींक यांच्या 'गुड बाय' आणि 'प्रोजेक्ट के' देखील आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.