गोव्याचा वैभव कामत ठरला 'राय कोगूळ' पुरस्काराचा मानकरी

मंगळूर येथील ‘मांड सोभाण’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘सोद -5’या संगीत स्पर्धेत उत्कृष्ट गायनासाठी त्याने ‘राय कोगूळ’ हा पुरस्कार मिळवला.
Vaibhav Kamat of Goa won the 'Rai Kogul' award

Vaibhav Kamat of Goa won the 'Rai Kogul' award

Dainik  Gomantak 

तो गाणं शिकलेला नाही. नाही म्हणजे, मध्यंतराच्या काळात एक वर्ष त्याने, गाणे औपचारिकपणे शिकण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्याच्या कामाच्या व्यस्ततेमुळे तो त्यात सातत्य ठेवू शकला नाही. वैभव कामत हा व्यवसायाने ‘इलेक्ट्रिकल इंजिनियर’ आहे. मात्र गाणं न शिकता, आपल्या कामाला प्राथमिकता देऊनसुद्धा तो दोन-अडीचशे स्पर्धकांमधून उत्कृष्ट गायक (Singer) म्हणून विजेता ठरू शकला ठरू शकला. हे अप्रूप त्याने हल्लीच करून दाखवले. मंगळूर येथील ‘मांड सोभाण’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘सोद -5’या संगीत स्पर्धेत उत्कृष्ट गायनासाठी त्याने ‘राय कोगूळ’ हा पुरस्कार मिळवला.

ही स्पर्धा दोन वर्षे चालली होती. कोरोनाकाळापूर्वी (Corona) झालेल्या चाचणीमधून वैभव निवडला गेला होता. मंगळूर, उडपी आणि गोवा (Goa) अशा तीन केंद्रांवर झालेल्या या निवड चाचणीत 245 स्पर्धक गायकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा कुठलाही भाग ऑनलाइन (Online) पद्धतीने घेतला गेला नाही. स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्या गोव्यात झाल्यानंतर अंतिम फेरीपर्यंत उरलेल्या सहा फेऱ्या मंगळूर येथे पार पडल्या. या प्रत्येक फेरीसाठी वैभवला मंगळूर शहराची वारी करावी लागायची.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Kamat of Goa won the 'Rai Kogul' award</p></div>
हेमा मालिनी यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत थ्रोबॅक फोटो केले शेअर

‘सोद-5’ च्या शेवटच्या फेरीत पुरुष आणि स्त्री गटात प्रत्येकी दहा स्पर्धक निवडले गेले होते. त्या दहामधून विजेता ठरण्यासाठी वैभवने निवडलेली दोन गाणी होती, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध (Music) केलेले, मनोहरराय सरदेसाय यांनी लिहिलेले, ‘पाचवी चोळी विलुदाची’ आणि क्रिस पेरी यांनी संगीतबद्ध केलेले व मूळ शैलेंद्र सिंग यांनी गायलेले, ‘काळजाचे सुख’ही गाणी. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरुष गटात वैभव कामत आणि जॅसन लोबो (मंगळूर) हे तर स्त्री गटात सोनल मोंतेरो (मंगळूर) आणि ट्रीजा लोपेस (होनावर) हे स्पर्धक होते.

अतिशय अटीतटीच्या ठरलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात वैभवने (Vaibhav) तर स्त्री गटात सोनलने बाजी मारली. या स्पर्धेत विजेता ठरल्यामुळे वैभवला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक लाभले आणि त्याशिवाय लंडन (London) येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात गायची संधीही त्याला लाभली आहे. याआधी वैभवने 2014 साली गायनासाठी सारस्वत आयडॉल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2015 साली ‘व्हॉईज ऑफ गोवा’ (Voice Off Goa) या स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com