Varisu Deleted Scene : सुपरस्टार विजयच्या 'वारिसू'मधला हा सीन हटवला गेला आहे

थलपती विजयच्या वारिसू या चित्रपटातला हा सीन कापला गेला आहे.
Varisu 
Thalpathy Vijay
Varisu Thalpathy VijayDainik Gomantak

अभिनेता विजयचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला वामशी पैडिपल्ली दिग्दर्शित 'वारिसु' चित्रपट अलीकडे एका कारणामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट याच वर्षी पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. विजय आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट 22 फेब्रुवारीपासून लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 

आता, निर्मात्यांनी चित्रपटातील एक हटविलेले दृश्य प्रदर्शित केले आहे ज्यामध्ये विजय आणि प्रकाश राज चित्रपटात परस्परांच्या विरोधी भूमिकेत आहेत.

डिलीट केलेला सीन म्हणजे विजय आणि प्रकाश राज यांच्या ऑफिसमधील समोरासमोर घडलेला एक प्रसंग. विजय हा प्रकाश राजला भेटायला येतो आणि त्याला बिजनेसच्या आघाडीवर लढण्याची आणि सरथ कुमारने सुरू केलेल्या त्याच्या वडिलांविरुद्ध सूड उगवण्यासाठी कुटुंबाला यात न ओढण्याची विनंती करतो. 

प्रकाश राज त्याची थट्टा करतात आणि त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करतात, विजय त्याच्या नेहमीच्या मूडमध्ये येतो आणि त्याला संघर्षाचा इशारा देतो आणि त्याच्या ऑफिसमधून एका स्टाइलिश अंदाजात बाहेर पडतो.

Varisu 
Thalpathy Vijay
Kacha Badam Singer Tragedy : "माझंच गाणं आता मला गाता येत नाही"! 3 लाखांच्या नादात गायकाने 'कच्चा बादाम' कायमचं गमावलं.

दिल राजू निर्मित हा चित्रपट तमिळ-तेलुगू दोन भाषांमध्ये आहे. चित्रपटाची कथा कौटुंबिक-केंद्रित आहे आणि अॅक्शन, कथानक आणि उत्तम गाण्यांच्या संपूर्ण पॅकेजसह एक हृदयस्पर्शी कौटुंबिक मनोरंजन असेल असे म्हणावे लागेल. 

रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, तर प्रकाश राज आणि सरथ कुमार या चित्रपटात आपला छाप सोडून जातात. तर प्रभू, प्रकाश राज, जयसुधा, शाम, तेलुगू अभिनेता श्रीकांत आणि योगी बाबू सहाय्यक भूमिकेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com