सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर ३३ वर्षांनंतर उधळणार नृत्याचे रंग

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर तीच्या गंमत जंमत या सुपरहिट मराठी सिनेमातील ‘उधळीत येरे गुलाल सजणा’ या सुपरहिट गाण्यावर रंग उधळतांना द्सणार आहे.

मुंबई : सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे, या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेतील येणाऱ्या भागात प्रेक्षकांना  ३१ डिसेंबरच्या रात्रीचं सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे. नवीन वर्षांचं स्वागत संपूर्ण शिर्के पाटील कुटुंब अगदी जल्लोषात करणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर तीच्या गंमत जंमत या सुपरहिट मराठी सिनेमातील ‘उधळीत येरे गुलाल सजणा’ या सुपरहिट गाण्यावर रंग उधळतांना द्सणार आहे. उत्तम असा परफॉर्म वर्षा उसगांवकर करणार आहे. या मालिकेतील त्यांची लहान सून म्हणजेच जयदिपच्या बायकोच्या भूमिकेत असणाऱ्या गिरीजा प्रभूने या खास नृत्यासाठी कोरिओग्राफी केली आहे.

या परफॉर्मन्सविषयी बोलतांना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “गंमत जंमत सिनेमात मी उधळीत येरे गुलाल सजणा या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. त्यानंतर जवळपास ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या गाण्यावर परफॉर्म करण्याचा योग जुळून आला आहे याचा मला आनंद होतोय. इतक्या वर्षात मी कधीच या गाण्यावर परफॉर्म केलं नाही.

त्याकाळच्या बऱ्याच अभिनेत्रिंनी या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होतेय. ३१ डिसेंबरच्या विशेष भागात माझा हा खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. मालिकेतली माझी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे.”

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांसाठी एक नवा उत्साह 31 डिसेंबर ला घेऊन येणार असल्याचं दिसत आहे.

 

संबंधित बातम्या