धवन कुटुंबात सुरू झाली लगिनघाई...

धवन कुटुंबात सुरू झाली लगिनघाई...
Varun Dhawan and Natasha Dalal going to marry on January 24

मुंबई: सोशल मीडियावर अभिनेता वरुण धवन आणि नताशा दोघेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचबरोब त्यांच्या लग्नाच्या तारखेवरून सोशल मीडियावर गप्पा रंगण्यासही सुरुवात झाली. पण आता लग्नाची तारीख ठरल्याबरोबर  चाहत्यांनी त्या दोघांनाही शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. आता वरुण धवन आणि नताशा दलाल दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

वरुणनने घेतलेल्या लग्नाच्या निर्णयामुळे त्याचे वडिल डेव्हिड धवन आणि काका अनिल धवन यांना अत्यंत आनंद झाला आहे. त्याचे काका एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, “माझ्या पुतण्याचे लग्न येत्या 24 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता त्याच्या लग्नाची तयारी सुरु केली आहे. संपूर्ण नियोजन केले आहे. सगळीकडे लगीनघाई सुरु झाली आहे, हाताशी कमी वेळ असल्याने घाईने सगळ्याच गोष्टी कराव्या लागणार आहे.”

डेव्हिड धवन यांनी तयार केलेल्या आतापर्यतच्या चित्रपटांमध्ये तुम्ही का दिसला नाहीत? असा प्रश्न अनिल यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की, “मी त्यांच्याबरोबर रास्कल्स, हिरो नं. 1 आणि कुली नं. 1 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्या भूमिकांची फारशी कुणाला माहिती नाही. ज्या चित्रपटांत माझ्यासाठी भूमिका होती त्यात मी काम केले. ज्यात नव्हते त्यात मी विनाकाकारण लुडबूड केली नाही. मुळात माझ्या भावाला ज्याप्रकारे कॉमेडी चित्रपट करायला आवडतात तसे मला आवडत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. ते मला सुट होत नाहीत. ज्यावेळी माझे करियर सर्वात टॉपला होते तेव्हा माझी इमेज ही एका शांत हिरोसारखी होती. त्यामुळे जेव्हा अॅक्शन चित्रपट करण्याची वेळ आली तेव्हा मात्र मी माघार घेतली. याचे कारण म्हणजे गुंडांना मारहाण करताना ते मला हास्यास्पद वाटले असते."

फार कमी जणांना डेव्हिड धवन यांचे लहान भाऊ अनिल यांच्याविषयी माहिती आहे. एकेकाळी त्यांनीही हिट चित्रपट दिले आहेत. 70 च्या दशकात  पिया का घर, अन्नदाता, समझौता, चेतना, हवस सारखे हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतर त्यांच्या करिअरला ब्रेक लागला. तोपर्यत त्यांचे भाऊ बॉलीवूडमधील मोठे निर्माते आणि दिग्दर्शक झाले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com