लग्नाच्या दोन दिवस आधी वरूण धवनच्या गाडीला अपघात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

वरुण धवन आणि नताशा दलालच्या यांच्या लग्नाआधी, ग्रुम-टू-बी वरूण धवनच्या गाडीला अलिबागमध्ये किरकोळ अपघात झाला.  

अलिबाग : वरुण धवन आणि नताशा दलालच्या यांच्या लग्नाआधी, ग्रुम-टू-बी वरूण धवनच्या गाडीला अलिबागमध्ये किरकोळ अपघात झाला.  अलिबागच्या पंचतारांकित हॉटेल ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये आज हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाचे उत्सव आधीच सुरू आहेत. काल संध्याकाळी वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. 

किंग खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवर मारामारी

वरुण धवन शुक्रवारी अलिबागमध्ये आपल्या बॅचलर पार्टीला जात असताना त्याच्या गाडीला एक छोटा अपघात झाला. बातमीनुसार वरुण धवनच्या मित्रांनी लग्नाच्या ठिकाणाजवळ त्याच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते होते.वरुण धवनच्या गाडीचे किंवा त्यातील कोणालाही मोठे नुकसान झालेले नाही.वरुण धवन आणि नताशा दलाल लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि बर्‍याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

प्रसिध्द भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

संबंधित बातम्या